‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या ‘रोशन सोढी’नं मालिका का सोडली? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:03 PM2021-07-30T18:03:11+5:302021-07-30T18:03:36+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: गुरूचरण यांनी तब्बल 12 वर्ष या मालिकेत काम केलं. गेल्यावर्षी त्यांनी ही मालिका सोडली. तेव्हा त्यांच्या निर्णयानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Gurucharan Singh aka Roshan Singh Sodhi why leave the show | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या ‘रोशन सोढी’नं मालिका का सोडली? 

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या ‘रोशन सोढी’नं मालिका का सोडली? 

Next
ठळक मुद्देदयाबेन अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी शो सोडून गेली ती अद्याप परतलेली नाही. यानंतर अंजली भाभीची व्यक्तिरेखा साकारणा-या नेहा जोशीने मालिकेला रामराम ठोकला.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेतील पात्र, ही पात्र साकारणारे कलाकार म्हणजे चाहत्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मालिकेप्रमाणे यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच एखादा कलाकार मालिका सोडतो, तेव्हा चाहते हळहळतात. निराश होतात. दयाबेन अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी शो सोडून गेली ती अद्याप परतलेली नाही. यानंतर अंजली भाभीची व्यक्तिरेखा साकारणा-या नेहा जोशीने मालिकेला रामराम ठोकला. इतकंच नाही तर  काही दिवसांपूर्वी मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह ( Gurucharan Singh aka Roshan Singh Sodhi) यांनीही मालिका सोडली. गुरूचरण यांनी तब्बल 12 वर्ष या मालिकेत काम केलं होत. गेल्यावर्षी त्यांनी ही मालिका सोडली. तेव्हा त्यांच्या निर्णयानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
गुरूचरण यांनी मालिका का सोडली, हे गुलदस्त्यात होतं. पण आता त्यांनी स्वत: या कारणाचा खुलासा केला आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शो सोडण्यामागचं कारण सांगितलं.

म्हणून सोडली मालिका...
मी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली तेव्हा यावर जास्त चर्चा झाली नाही.  या मालिकेमुळं मला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता आली. लोक मला आजही रोशन सोढी या नावाने ओळखतात. ही मालिका का सोडली, असा प्रश्न मला विचारल्या जातो. यामागं अनेक व्यक्तिगत कारणं होती. माझ्या वडिलांची सर्जरी झाली होती. त्यामुळे मला त्यांच्यासोबत रहावं लागलं. तसेच कुटुंबाशीसंबंधीत आणखी काही समस्या होत्या. त्यामुळे मला मालिका सोडावी लागली. मी जवळपास 12 वर्षे मालिकेत काम केले होते. त्यामुळे शो सोडण्याचं दु:ख नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

सध्या काय करताहेत सोढी?
मालिका सोडल्यानंतर मी जवळपास दोन महिने यूएसमध्ये होतो. सध्या मी स्वत:ला वेळ देत आहेत. स्वत:मध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे यावर काम करत आहे. आई-वडिलांसाठी देखील काम करत आहे. अलीकडे एका ब्रँडसाठी मी डिजिटल फिल्म शूट केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Gurucharan Singh aka Roshan Singh Sodhi why leave the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app