टप्पूवर कोसळला दु:खाचा डोंगर, ‘तारक मेहता...’ फेम भव्या गांधीच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:08 PM2021-05-12T13:08:15+5:302021-05-12T13:32:13+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :10 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 10 दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame bhavya gandhi lost his father due to coronavirus | टप्पूवर कोसळला दु:खाचा डोंगर, ‘तारक मेहता...’ फेम भव्या गांधीच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन

टप्पूवर कोसळला दु:खाचा डोंगर, ‘तारक मेहता...’ फेम भव्या गांधीच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन

Next
ठळक मुद्देभव्या सध्या टीव्हीपासून दूर गुजराती चित्रपटांमध्ये बिझी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’  या मालिकेतील प्रत्येक पात्रांवर रसिकांनी भरभरून पसंती दर्शवली.

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्तापर्यंत कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. मंगळवारी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) भव्या गांधी (Bhavya Gandhi) याचे वडील विनोद गांधी यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला, गेल्या दहा दिवसांपासून ते मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात भरती होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली.

भव्या गांधीचे वडील कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये होते. दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 10 दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. मंगळवारी त्यांच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण अचानक कमी झाले आणि याचदरम्यान त्यांचे निधन झाले.
भव्या गांधी वडिलांच्या खूप जवळ होता. त्यांच्या निधनामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.

भव्या सध्या टीव्हीपासून दूर गुजराती चित्रपटांमध्ये बिझी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’  या मालिकेतील प्रत्येक पात्रांवर रसिकांनी भरभरून पसंती दर्शवली. टप्पूची व्यक्तिरेखा साकारणारा भव्या गांधी हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला होता. भव्याला याच मालिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेतील त्याचा अभिनय, त्याची केस उडवण्याची स्टाइल सगळे काही रसिकांना खूपच आवडायचे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच तो या मालिकेचा भाग होता.  9 वर्षे तो ही भूमिका साकारत होता़ 2017 मध्ये त्याने हा शो सोडला होता. मात्र आजही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या स्टारकास्टसोबत भव्याचे ऋणानुबंध कायम आहेत. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणा-या दिशा वकालीसोबत त्याचा खूप चांगला बॉन्ड आहे.

म्हणून सोडली होती मालिका
 एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये  भव्याने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले होते. टप्पू ही भूमिका खूप चांगली होती, पण वेळेनुसार बदल करण्याता येत नव्हते. साचेबद्ध भूमिकेत अडकले तर पुढे काहीच करता येणार नाही. शिवाय  मेकर्ससोबत माझ्या कॅरेक्टरला दुय्यम वागणूक दिली जात होती. त्या भूमिकेला स्कोप देण्यात आला नाही. त्यामुळेच शो सोडण्याचा निर्णय घेतला होता, असे तो म्हणाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame bhavya gandhi lost his father due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app