बबिताजीची एक चूक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या कलाकारांवर पडणार भारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 05:27 PM2021-07-25T17:27:46+5:302021-07-25T17:28:34+5:30

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या मेकर्सनी घेतला हा मोठा निर्णय

taarak mehta ka ooltah chashmah cast made to sign an undertaking after munmun dutta casteist slur | बबिताजीची एक चूक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या कलाकारांवर पडणार भारी?

बबिताजीची एक चूक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या कलाकारांवर पडणार भारी?

Next
ठळक मुद्देमुनमुननं केलेली चूक भविष्यात तारक मेहता का उल्टा चश्माचा कुठलाही कलाकाराने करू नये, यासाठी प्रॉडक्शन हाऊसनं एक मोठा निर्णय घेतल्याचेही कळतंय.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील बबिताजी अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तानं (Munmun Dutta) मालिका सोडण्याची सध्या जोरदार चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर अनेक दिवसांपासून मुनमुन शूटींगसाठी सेटवर आलेली नाही. या चर्चादरम्यान मुनमुननं मालिका सोडली नसल्याचं प्रॉडक्शन हाऊसनं स्पष्ट केलं आहे. पण कदाचित मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्या डोक्यात काही वेगळंच सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी मुनमुन दत्ता जातीवाचक शब्दांचा वापर केल्यामुळं वादाच्या भोव-यात सापडली होती. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, या वादानंतर मुनमुननं सेटवर जाणं बंद केलं होता. यानंतरच तिनं हा शो सोडल्याची चर्चा सुरू झाली होती.
आता ई-टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मुनमुनं दत्ता सेटवर न जाण्याचं कारण काही वेगळंच असल्याचं कळतंय. होय, वृत्तानुसार, मुनमुननं जातीवाचक शब्दांच्या वापराप्रकरणी पुन्हा एकदा माफी मागावी, अशी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्मात असित मोदी यांची इच्छा आहे. मुनमुननं या प्रकरणानंतर लगेच माफी मागितली होती. पण मुनमुननं पुन्हा एकदा माफी मागावी, असं असित मोदी यांचं म्हणणं आहे.  आता ती शोमध्ये परतणार की नाही हे येत्या काळात कळेलच.

मेकर्सनी घेतला मोठा निर्णय
मुनमुननं केलेली चूक (Munmun Dutta Controversy Effect) भविष्यात तारक मेहता का उल्टा चश्माचा कुठलाही कलाकाराने करू नये, यासाठी प्रॉडक्शन हाऊसनं एक मोठा निर्णय घेतल्याचेही कळतंय. ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, शोचा कोणताही कलाकार भविष्यात कोणाबद्दलही आक्षेपार्ह वा जातीवाचक शब्दांचा वापर करणार नाही, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणारे कृत्य वा वक्तव्य करणार नाही, असा एक करार कलाकारांकडून साईन करून घेतला जाणार आहे. या कराराबद्दल माहिती होताच कलाकार हैराण आहेत. पण हा करार साईन करावाच लागेल, याबद्दल प्रॉडक्शन हाऊस आग्रही असल्याचं कळतंय.

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah cast made to sign an undertaking after munmun dutta casteist slur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app