गुड न्यूज! दयाबेन नंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील ही अभिनेत्री बनली आई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:15 PM2019-11-28T17:15:09+5:302019-11-28T17:22:52+5:30

या अभिनेत्रीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमाचा दिग्दर्शकासोबतच लग्न केले आहे.

Taarak mehta ka ooltah chashmah actress priya ahuja welcomes baby boy | गुड न्यूज! दयाबेन नंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील ही अभिनेत्री बनली आई

गुड न्यूज! दयाबेन नंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील ही अभिनेत्री बनली आई

googlenewsNext

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. दिशाने गेल्या दोन वर्षीपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. दिशानंतर तारक मेहतामधील रिपोर्टर रिटाने मुलीला जन्म दिला आहे. या मालिकेत रिटाची भूमिका प्रिया आहुजा राजदा साकारत आहे. प्रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुडन्युज प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे.  


प्रियाने काही दिवसांपूर्वीच मॅटर्निटी फोटो शूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत होती. या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिचा पती म्हणजेच मालव राजदाला देखील पाहायला मिळाला होता  मालव राजदा तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचा दिग्दर्शक असून त्या दोघांची ओळख याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.प्रियाने नोव्हेंबर 2018 मध्ये दिग्दर्शक मालव राजदासह लग्न केले. 


तारक मेहता या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah actress priya ahuja welcomes baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.