'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मालिका सोडल्यानंतर ती संसारात रमली होती. त्यामुळेच तिने मालिकेत एंट्री करण्यावर नकार दिला होता. गेली दोन वर्ष दया मालिकेत दिसली नाही. नुकताच दया म्हणजे दिशाचा नवीन लुक समोर आला आहे. या लुकमध्येऑनस्क्रीन लुकप्रमाणेच ऑफस्क्रीन लुकमध्येही सुंदर दिसत आहे. 

निवांत असा काढलेल्या फोटोत दिशाने कुर्ता पैजामा परिधान केलेला आहे. त्यावर छानसा असा हेअकटही मुळे तिच्या सौंदर्यांला चार चाँद लागले आहे. नेहमी साडीत दिसणारी दिशा यावेळी नवीन लुकमध्ये पाहायला मिळाली. तिचा हा लुक पाहून चाहते तिच्या या फोटोवर आनंद व्यक्त करत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी प्रोड्यूसर असित मोदीने दिशाच्या परतण्याच्या बातमीची अधिकृत घोषणा केली होती. "दिशा दया म्हणून परतणार आहे. यामध्ये एका महिन्याचा वेळ लागणार आहे. आम्ही परत परत तिला शोमध्ये येण्याचा आग्रह करत होतो, पण तिची मुलगी लहान असल्याने तयार होत नव्हती. दिशा सप्टेंबर 2017 मध्ये मॅटर्निटी लीव्हवर गेली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये तिने मुलीला जन्म दिला, दोन वर्षांनंतरही प्रेक्षक तिच्या परतण्याची वाट पाहात होते. त. मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या की, दिशाचा पती मयूर पढियाने दिशाला दिवसातून फक्त 4 तास आणि महिन्यामध्ये केवळ 15 दिवस कामाची अट ठेवली होती.


दया मालिकेत परतणार हे आता मालिकेच्या कथानकावरून देखील आपल्या लक्षात आले आहे. पण आता या मालिकेच्या बाबतीत एक वेगळीच बातमी आली आहे. दिशा वाकानी या मालिकेत कायमची नव्हे तर केवळ एका विशेष भागासाठी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 
जेठालालला त्याची पत्नी दयाची खूप आठवण येते आहे आणि त्यामुळे देवीसमोर म्हणणार आहेत की, दया परत येत नाही तोपर्यंत गरबा खेळणार नाही.

 

या कारणामुळे दयाबेनला परत गोकुळधाम सोसायटीमध्ये आणण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले असून दिशा परतेल याची आशा सगळ्यांनी सोडली आहे. पण यातच आता दयाबेनची एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी दयाबेनची एन्ट्री स्पेशल बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले असल्याची चर्चा रंगली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress Disha Vakani Aka Daya Ben New Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.