Sushant Singh Rajput fans are demanding the ban of The Kapil Sharma Show | आता कपिल शर्मा शोवर रसिकांचा संताप, बॉयकॉट करण्याची होतेय मागणी

आता कपिल शर्मा शोवर रसिकांचा संताप, बॉयकॉट करण्याची होतेय मागणी

रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो. त्याच्या या शोमुळेच रसिकही सारे दुःख विसरून दोन क्षण हसत हसत घालवतो. याच शोवर आता रसिकांचा संताप होताना दिसत आहे. इतकेच नाहीतर कपिल शर्मा शोवरही टीकेची झोड उठली असून बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसत आहे. सोशल मीडियावर कपिल शर्मा जबरदस्त ट्रोल होताना दिसतोय. अनेकांनी हा शो बंद करण्याची मागणी का केली असावी असेही प्रश्न निर्माण होत आहे. सुशांत प्रकरणानंतर सलमानच्या चित्रपटानंतर तो प्रोड्यूस करीत असलेल्या मालिकांनाही बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे कपिल शर्माशोचा प्रोड्युसर हा सलमान खान आहे. सलमाचा संबधीत असलेल्या  शो असल्यामुळे  बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसत आहे. 

 

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस शोबाबतही अशाच प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. हा शोदेखील कोणी पाहून नये यासाठी बॉयकॉट बीग बॉस हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. पहिला प्रोमो समोर आल्यानंतर यावर रसिकांनी संताप व्यक्त केला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून नवीन वाद सुरू झाला आहे. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सुशांतचे चाहते सलमानविरोधात ट्विट, पोस्ट करत आहेत. 


करण जोहर आणि सलमानने मिळून सुशांत विरोधात कट रचला असल्याचे माहिती समोर आली होती, करणनने सुशांत आणि जॅकलीनला 'ड्राइव्ह' सिनेमासाठी साइन केले होते. मात्र याच काळात जॅकलीनला रेस-3 मध्ये काम करण्याची संधी मिळाली. करणने सुशांतला दुसरी कोणतीच फिल्म साइन करु दिली नाही. मात्र जॅकलीनला सलमानच्या फिल्ममध्ये काम करु दिले. यामुळे ड्राइव्हच्या शूटिंगला उशीर झाला. सुशांतच्या फिल्मी करिअरला संपवण्याचा काही लोक सातत्याने प्रयत्न करत होते. सलमान आणि करणने मिळून त्याचे करिअर उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput fans are demanding the ban of The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.