ठळक मुद्देसुरभी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत केवळ काही भागांमध्ये दिसली होती. पण त्यावेळी निर्मात्यांना तिचे काम न आवडल्यामुळे अभिनय चांगला कर... अन्यथा तुला रिप्लेस केले जाईल असे तिला सांगण्यात आले होते. 

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल, अब्दुल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. पण या मालिकेत काम करणाऱ्या एका कलाकाराला अभिय सुधार अथवा घरी जा... असे सांगण्यात आले होते असा खळबळजनक खुलासा या कलाकाराने केला आहे. 

सुरभी चंद्राने इश्कबाज आणि संजीवनी या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मुख्य भूमिकेत दिसण्याआधी सुरभी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत केवळ काही भागांमध्ये दिसली होती. पण त्यावेळी निर्मात्यांना तिचे काम न आवडल्यामुळे अभिनय चांगला कर... अन्यथा तुला रिप्लेस केले जाईल असे तिला सांगण्यात आले होते. 

सुरभीने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मला रिप्लेस करण्याविषयी सांगण्यात आले होते. त्यामुळे माझी आई मला सतत चांगला परफॉर्मन्स द्यायला सांगत होती. असित मोदी यांनी माझ्या आईला सांगितले होते की, पूर्ण एपिसोड हा माझ्यावर असल्याने मी चांगला अभिनय करणे गरजेजे आहे. खरं सांगू तर त्यातील माझा अभिनय कसा झाला होता हे आजही मी तुम्हाला सांगू शकत नाही. आजही अनेकवेळा तो एपिसोड टिव्हीवर दाखवला जातो. 

Web Title: Surbhi Chandna recalls the time when the makers of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah wanted to replace her PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.