‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व लवकरच, यंदा हे असणार खास वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:29 AM2019-08-19T11:29:34+5:302019-08-19T11:30:39+5:30

५ ते ५५ हा वयोगट असणार आहे म्हणेजच बच्चेकपंनी पासून सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. 

'Sur Nawa Dhyaas Nava' Third Season Starting Soon | ‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व लवकरच, यंदा हे असणार खास वैशिष्ट्य

‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व लवकरच, यंदा हे असणार खास वैशिष्ट्य

googlenewsNext

गाण्याची मैफल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांची पुन्हा गट्टी जमणार कारण  लवकरच सुपरहिट  कार्यक्रम ‘सूर नवा ध्यास नवा’ लवकरच सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये गायकांनी विविध शैलींमधील सादर केलेली गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या दोन पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी पुन्हा घेऊन येत आहे ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे तिसरे पर्व. या पर्वाचे विशेष म्हणजे स्पर्धकांना वयाची अट नसेल. ५ ते ५५ हा वयोगट असणार आहे म्हणेजच बच्चेकपंनी पासून सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. 


या पर्वाचा शुभारंभ सप्टेंबरमध्ये होणार  असून . बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील आपल्या सगळ्यांचा लाडका स्पर्धक पुष्कर जोग प्रत्येक शहरात सुरवीरांना प्रोत्साहन देईल तर सुप्रसिध्द संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि संगीत दिग्दर्शक मिलिंद जोशी प्रत्येक शहरातुन सुरवीरांचा शोध घेतील.

गेल्या सिझनमध्ये स्वराली जाधव हिने सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमाची राजगायिका होण्याचा मान पटकावला होता.  सहा महिन्यांपूर्वी झालेल्या २१ छोट्या सुरवीरांसोबत सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम सहा शिलेदार - स्वराली जाधव, मीरा निलाखे, सई जोशी, उत्कर्ष वानखेडे, चैतन्य देवढे आणि अंशिका चोणकर. याच सहा स्पर्धकांमध्ये रंगला सुर्वण कट्यार मिळवण्यासाठी सुरांचा महासंग्राम. महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये रंगली होती. तसेच महा अंतिम सोहळ्यामध्ये शाल्मली, अवधूत गुप्ते आणि विशेषतः महेश काळे यांनी सहा छोट्या सुरवीरांसोबत सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थितांना पुन्हाएकदा भारावून टाकले होते. 

Web Title: 'Sur Nawa Dhyaas Nava' Third Season Starting Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.