ज्या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम म्हणजे सूर नवा ध्यास नवा...  यावर्षी कार्यक्रमाचे चौथं पर्व असून मेगा ऑडिशन्स पार पडल्या ज्यामध्ये आपल्याला एक से बडकर गाणी ऐकायला मिळाली आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाल्या १६ गायिका या १६ गायिकांमध्ये रंगणार आहे विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द आणि महाराष्ट्राला मिळणार आहे महाराष्ट्राची एक नवी “आशा उद्याची... येत्या रविवारी  सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर रसिकांना पाहता येणार आहे.

 

कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरमध्ये निवडून आलेल्या १६ स्पर्धकांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना आनंद नक्कीच मिळणार आहे.  पण तोच आनंद द्विगुणीत होणार आहे. कारण, अवधूत गुप्ते यांचा धमाकेदार परफॉर्मन्स देखील सादर करणार आहे.

 अवधूत गुप्ते यांनी नाच ग घुमा, परी म्हणू की अप्सरा आणि डिपाडी डिपांग गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याच सोबत आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. आपल्या गोड आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

सावनी रविंद्रला 67व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला असून सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर तिचा सत्कार करण्यात आला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sur Nava Dhyas Nava - All set for its Grand Premier, surprise awaits for fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.