सुनील ग्रोव्हरवर आलीय ज्यूस विकण्याची वेळ, व्हिडिओ झाला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:36 PM2021-03-01T17:36:24+5:302021-03-01T17:38:09+5:30

सुनीलवर ज्यूस विकण्याची वेळ का आली असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना पडत आहे. 

Sunil Grover flaunts his juice-making skills amid TKSS return rumours | सुनील ग्रोव्हरवर आलीय ज्यूस विकण्याची वेळ, व्हिडिओ झाला व्हायरल

सुनील ग्रोव्हरवर आलीय ज्यूस विकण्याची वेळ, व्हिडिओ झाला व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देसुनीलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत 'अपनी डार्लिंग को ज्यूस पिलाओ' असं कॅप्शन दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सुनील रस्त्यावर छोले विकताना दिसला होता.

कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे सुनील ग्रोव्हरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत तो चक्क ज्यूस विकताना दिसत आहे. सुनीलवर ज्यूस विकण्याची वेळ का आली असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना पडत आहे. 

सुनील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलाच सक्रिय असतो. त्याचे कॉमेडी व्हिडीओ, फोटो चाहत्यांसह तो शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला त्याचा विनोदी अंदाज पाहता येतो. ऑनस्क्रीन असो या ऑफस्क्रीन सुनील ग्रोव्हर नेहमीच मेजशीर अंदाजात राहणे पसंत करतो. रसिकांना खळखळून हसवत असतो. त्यामुळे आज लाखोंच्या संख्येत सुनील ग्रोव्हरचे चाहते जगभरात पसरले आहेत. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

सुनीलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत 'अपनी डार्लिंग को ज्यूस पिलाओ' असं कॅप्शन दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सुनील रस्त्यावर छोले विकताना दिसला होता. त्याच्या या व्हिडीओलाही चाहत्यांची पसंती मिळाली होती. छोले विकल्यानंतर आता सुनील ज्यूस विकताना दिसत आहे. सुनील हा ज्यूस 20 रुपयांना विकत असून तोच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगत आहे. सुनीलच्या या व्हिडिओला 18 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून त्याच्या या अंदाजावर त्याचे चाहते फिदा आहेत. 

छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही सुनीलने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील त्याच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी सुनिल आपल्या हटके मेजशीर अंदाजाने लक्ष वेधून घेत असतो.

Web Title: Sunil Grover flaunts his juice-making skills amid TKSS return rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.