'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. मालिकेत अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिने भूमिका साकारली होती. मात्र सुदंरा मनामध्ये भरली मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली आहे. अक्षया इतर अभिनेत्रींप्रमाणे नक्कीच सडपातळ दिसत नसली तरी तिच्या कसदार अभिनयाने ती नक्कीच रसिकांची पसंती मिळवणार असा विश्वास तिला आहे. मालिकेचे प्रोमो टीव्हीवर झळकू लागल्यापासून रसिकांमध्येही मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. अगदी त्याचप्रमाणे अक्षयला रसिक कितपत स्विकारतील याचेही दडपण होते. 


पहिल्याच दिवशी सेटवर मोठ्या उत्साहात अक्षयाने शूटिंग केले. मोठ्या मेहनतीने तिने तिचे पात्र साकारले आहे. मालिकेचा पहिला भाग जेव्हा तिने पाहिला तेव्हा मात्र अक्षया भावूक झाली. मनात दडलेल्या भावनांना तिने वाट मोकळी करून दिली. ढसाढसा रडली. अक्षया रडत असल्याचे पाहून सेटवर उपस्थितांना प्रश्नच पडला नेमकं तिला झाले तरी काय तर. अक्षयाला खूप आनंद झाला होता. ब-याच दिवसांनतर तिने केलेले काम पाहून तिला आनंद झाला आनंदाच्या भरात रडलेली अक्षया डोळ्यांत तरळणारे आनंदाश्रु होते.

 या मालिकेत अक्षया नाईक लतिकाची भूमिका आणि समीर परांजपे अभिमन्यूची भूमिका साकारणार आहेत. अक्षयाला पाहून तिच्या  शरीराने लठ्ठपणावर अधारित मालिका असल्याचा अंदाज रसिकांनाही आला होता. लहानपणापासून तिला टोमणे ऐकावे लागतात. याच एकमेव कारणामुळे तिचे लग्नदेखील अद्याप जमले नाही. ३४ स्थळांकडून आजवर तिला नकार आला आहे. 

सगळ्यांना आनंदी ठेवणारी, सुख – दु:खात साथ देणार्‍या लतिकाने या गोष्टीचा स्वीकार केला आहे आणि याचा तिला फारसा फरकही पडत नाही. याउलट दिसायला देखणा, अंगापिडानं मजबूत, हुशार, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा अभिमन्यू आहे.

स्वत: फिट असलेल्या अभिमन्यूला अख्ख्या गावाला ‘फिट’ करायचं आहे, म्हणून त्याला स्वत:ची व्यायामशाळा उघडायची आहे. अभिमन्यूचं स्वप्न आणि लतिकाचं लग्न यावर मालिका आधारित आहे. मनवा नाईकने मालिकेची निर्मिती केली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "Sundara Mana Madhe Bharli Actress Akshaya Naik Cried On the first day Of Shooting, Reason Will Shocked You

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.