Sukhanchya sarine mann he bavre completed 150 episodes | 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेने पूर्ण केला १५० भागांचा टप्पा!
'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेने पूर्ण केला १५० भागांचा टप्पा!

ठळक मुद्देसिद्धार्थ आणि अनु यांची मैत्री ती तोडू शकेल का ?

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिकेने १५० भाग पूर्ण केले आहेत. मालिका सुरु होण्याआधीपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता होती...कारण, या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांना भेटायला आली. तसेच मृणालचे छोट्या पडद्यावर कमबॅक देखील झाले... वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, शर्मिष्ठा राउत हे कलाकार मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत, मंदार देवस्थळी या मालिकेचे दिग्दर्शन करतो आहे. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता तब्बल १५० भागांचा पल्ला गाठला आहे. मृणालने नुकताच तिच्या इंस्टावर १५० भाग पूर्ण केले याबद्दल शशांक आणि तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. शशांक आणि मृणालची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच घटना बघायला मिळणार आहेत. अनु आणि सिद्धार्थमध्ये पुन्हा मैत्री झाली आहे आणि हेच कुठेतरी दुर्गाला खटकत आहे आता यांची मैत्री पुन्हा तोडण्यासाठी ती कुठलं नवं कारस्थान रचेल ? सिद्धार्थ आणि अनु यांची मैत्री ती तोडू शकेल का ? हे बघणे रंजक असणार आहे. 


मालिकेने १५० भाग पूर्ण केले याबद्दल बोलताना अनु म्हणजेच मृणाल दुसानिस म्हणाली, “सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका करतानाचा प्रवास अप्रतिम आहे... आम्ही खूप मेहेनत घेतो आहे, खूप मज्जा येते आहे. आमची सेटवर खूप छान टीम तयार झाली आहे. १५० भाग पूर्ण झाले आहेत यावर विश्वास बसत नाहीये. खरं सांगायचं तर अनु ही भूमिका माझ्या खुपचं जवळची भूमिका आहे.

मी आजवर साकारलेल्या सगळ्याच भूमिका मला प्रिय आहेत आणि महत्वाच्या वाटतात पण, अनु मला जवळची वाटते कारण, ती खूप खंबीर आहे, स्वावलंबी आहे आणि खूप माझ्यासारखी आहे”. प्रेक्षकांनी आम्हांवर भरभरून प्रेम केलं आहे यापुढे देखील असचं करत रहा, इतकचं सांगेन.”

Web Title: Sukhanchya sarine mann he bavre completed 150 episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.