झी मराठी वाहिनीवर अल्पावधीतच तुला पाहते रे मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि जवळपास वर्षभरानंतर या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील कलाकार देखील सर्वांना मिस करत आहेत. तर प्रेक्षकही अजूनही विक्रांत व ईशाला विसरले नाहीत. विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांची प्रेमकथा प्रेक्षकांना खूपच भावली होती. या मालिकेसाठी अभिनेता सुबोध भावे याने किती मानधन घेतलं हे समोर आलं आहे.

 महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तुला पाहते रे' मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी सुबोधला ३५ हजार इतकं मानधन दिलं गेलं होतं. दरम्यान, सुरुवातीला मालिका फक्त २००-२५० भागात संपवण्यात येणार होती. मात्र, प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद बघून मालिकेनं ३०० भागांचा टप्पा गाठला. म्हणजे जवळपास १ कोटी ५ लाख रुपये इतके मानधन सुबोधने घेतलं आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेच्या निर्मात्यांना विक्रांत सरंजामे हे पात्र फक्त सुबोधच करू शकतो असा विश्वास होता. जर त्याने या मालिकेला नकार दिला तर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली नसती. सुबोधने मालिकेची कथा ऐकून लगेचच मालिकेसाठी होकार दिला आणि चित्रीकरणाला सुरूवात झाली.


‘तुला पाहते रे’मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.  सुरूवातीला साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर व सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेने रसिकांना  भुरळ पाडली. त्यानंतर या मालिकेत टर्न अँड ट्विस्ट आले.

विक्रांत सरंजामे आणि ईशाचे लग्न झाले. ईशा हिच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले. शिवाय विक्रांत हाच राजनंदिनीला मारतो अशा बºयाच गोष्टी मालिकेत पाहायला मिळाल्या.

 २० जुलैला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.  २२ जुलै पासून या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका भेटीला येणार आहे.

Web Title: Subodh Bhave took this fees for role of Vikrant in Tula Pahate Re

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.