Stone pelting at ekta kapoor home for hurting sentiments in web show virgin bhasskar 2 | एकता कपूर पुन्हा अडकली वादात, वेबसीरिजमधल्या 'त्या' सीनमुळे जमावाची घरावर दगडफेक

एकता कपूर पुन्हा अडकली वादात, वेबसीरिजमधल्या 'त्या' सीनमुळे जमावाची घरावर दगडफेक

निर्मिती एकता कपूरच्या जुहू इथल्या घरावर मंगळवारी दगडफेक करण्यात आली. एकता कपूरच्या वेबसिरीज 'व्हर्जिन भास्कर  2'मधील एका सीनच्या विरोधात दगडफेक झाल्याची माहिती आहे. यामुळे एकताच्या बंगल्याच्या काही खिडक्यांचे नुकसान झाले आहे.  40 ते 50 जाणांच्या जमावाने एकताच्या घराबाहेर निदर्शनं केली. 'व्हर्जिन भास्कर  2' मध्ये एका हॉस्टेलचे नाव अहिल्याबाई होळकर ठेवण्यात आले होते. अहिल्याबाई होळकर यांचा वंशज भूषण सिंग राजे होळकर यांनी एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसला यासंदर्भात पत्र लिहून आपत्ती दर्शवली होती. 

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, एकताने बनवलेल्या या वेब सीरिजमधून हे दृश्य हटवावे आणि माफी मागावी असे आवाहन भूषण यांनी केले आहे. त्यांनी तसे न केल्यास भूषण यावर कायदेशीर कारवाई देखील करू शकते


सोशल मीडियावर एकताने मागितली माफी

या वादानंतर एकताने सोशल मीडियावर माफी मागितली आणि वेबसिरीजमधून तो सीन काढून टाकल्याचे सांगितले. एकताने 
लिहिले की, 'माझ्या लक्षात आलं की, 'व्हर्जिन भास्कर २' मध्ये एक सीन आहे ज्यात हॉस्टेलचे नाव अहिल्याबाई आहे. हॉस्टेलला दिलेल्या या नावामुळे समाजातील काही लोक दुखावले गेले. तो सीन कोणाच्याही भावना दुखावण्याच्या हेतूने नव्हता. यात कोणतंही आडनाव वापरण्यात आलं नव्हतं. फक्त पहिलं नाव वापरलं होतं. पण तरीही क्रिएटिव्ह डायरेक्टरने तो सीन काढून टाकला आहे. मी माझ्या टीमच्यावतीने दिलगिरी व्यक्त करते.

एकता कपूरच्या नव्या वेबसीरिजवरून नवा वाद; अहिल्याबाईंच्या नावाचा गैरवापर केल्यानं धनगर समाज संतप्त

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Stone pelting at ekta kapoor home for hurting sentiments in web show virgin bhasskar 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.