बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सोफी चौधरीचा बिकीनीमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. तिचा हा अंदाज कोणालाही घायाळ करेल असाच आहे. हा फोटो पाहून ''रोके ना रुके नैना'' अशा कमेंटस चाहते तिला देत आहेत. विशेष म्हणजे आता गोल्डन रंगाची बिकनी मधील हा फोटो आहे. त्यामुळे हा फोटो तिच्या चाहत्यांच्या अधिक पसंतीस उतरत आहे. म्हणून सध्या सोशल मीडियावर सोफीने गोल्डन बिकीनीत अक्षरक्षः आग लावली आहे.  त्यामुळे सध्या तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. 


काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.  तिच्या या फोटोलाही फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळाले होते. या फोटोत तिचा ग्लॅमरस, रॉकिंग अंदाज  आणि तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळाले होते. त्यामुळे सोफीचाही तो फोटो काहीसा वेगळा ठरला होता.  सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे सोफीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


तसेच सोफी खूप फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळेच सोफीचा ‘वर्क इट अप’ हा शोही रसिकांच्या भेटीला आला होता. यामधून बॉलिवूड सेलिब्रिटींचा फिटनेस फंडा, त्याचा आहार आणि त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी उलगडल्या गेल्या.  वूट आणि टिकटॉकच्या संयुक्त विद्यमाने #EduTok अंतर्गत या शोची संकल्‍पना मांडण्‍यात आली होती. हा शो #EduTok अंतर्गत भारताचा पहिला चॅट शो होता. 

Web Title: Sophie Choudry Hot & Sexy Pose In Golden Bikini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.