'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये.


मालिकेत भिडे मास्टरची मुलगी सोनूच्या भूमिकेत झिल मेहता झळकली होती. तिच्या भूमिकेने रसिकांवर मोहिनी घातली होती. तिचं कधी निरागस कधी खोडकर असणं रसिकांना चांगलंच भावलं होतं. तिची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती.

मालिकेत झिल मेहता उत्तम भूमिका साकारत होती. झीलने या मालिकेत जवळपास 6 वर्षे काम केले. लहानवयातच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झिल अचानक पडद्यापासून दूर गेली. शिक्षणावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून तिने ही मालिका सोडली होती. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेनंतर  रसिकांना तिचं दर्शन झालं नाही. अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा झिलचा तूर्तास तरी कोणताही इरादा नाही. सध्या ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे. झिल सध्या एमबीए करत आहे. यापूर्वी तीने बीबीए केले आहे. असेही म्हटले जाते की ती मटरफ्लाय नावाच्या ई-कॉमर्स कंपनीत सोशल मीडिया कार्यकारी म्हणूनही कार्यरत आहे. 

झिल मेहताला सोशल मीडियावर प्रंचड अ‍ॅक्टिव्ह असते. ती बर्‍याचदा तिचे फोटोदेखील पोस्ट करत असते. तीचे चाहते अद्यापही तिला खूप पसंत करतात अजूनही सगळे तिला सोनू याच भूमिकेमुळे जास्त ओळखतात. रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप  झिलाचा असतो.

त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. इन्स्टाग्रामवर झिलचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण आहे. ती आपला बराच वेळ मित्रमैत्रिणींसह घालवते. इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. 

झिलने मालिका सोडली तेव्हा तिच्या भूमिकेसाठी निधी भानुशालीची वर्णी लागली होती. काही वर्षानंतर तिनेही मालिका सोडली.अभ्यासामुळे हा शो सोडत असल्याचे निधीने सांगितले होते. निधी नंतर या भूमिकेत पलक सिधवानी झळकत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonu aka Jheel Mehta from Taarak Mehta, this is how she looks now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.