Sonalee kulkarni sing a song on sur nava dhyas nava reality show | सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर सोनाली कुलकर्णीने गायली अंगाई!
सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर सोनाली कुलकर्णीने गायली अंगाई!

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या तिसर्‍या पर्वाची चर्चा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आहे... कार्यक्रमातिल विविध वयोगटातील गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. या आठवड्यातील भागामध्ये देखील असेच काहीसे घडले. सध्या प्रसाद ओक दिग्दर्शित चिन्मय मांडलेकर लिखित हिरकणी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून याच निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टिम - सोनाली कुलकर्णी अमित खेडेकर प्रसाद ओक राजेश मापुस्कर सुर नवा ध्यास नवाच्या मंचावर येणार आहे ... यांनी मिळून मंचावर बरीच धम्माल मस्ती देखील केली.

सोनाली कुलकर्णीने चित्रपटामधील अंगाई सादर केली तर प्रसाद ओक ने देखील गाणे सादर केले... सगळ्याच स्पर्धकांनी एकसे बडकर एक गाणी सादर करून सगळ्यांची मने जिंकली आहेत. राजेश मापुस्कर यांनी 3 इडियट्स चित्रपटा दरम्यानचा किस्सा सांगितला आणि अमोलच्या गाण्याला त्यांच्याकडून दाद मिळाली... ते काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा सूर नवा ध्यास नवाच भाग. तसेच स्वराली जोशीने सादर केलेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटातील “बाबा” हे गाणे ऐकून राजेश मापुस्कर भावुक झाले. 

कार्यक्रमामध्ये मंजिरी ओक यांनी त्यांच्या आणि प्रसाद ओक यांच्या लव्ह स्टोरीबद्दल देखील सांगितले ते कसे भेटले, त्यांचे लग्न कसे जुळले... या आठवड्यामध्ये स्वप्नील बांदोडकर गेस्ट जज म्हणून सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर येणार असून त्यांचा मोलाचा सल्ला स्पर्धकांना मिळणार आहे.


Web Title: Sonalee kulkarni sing a song on sur nava dhyas nava reality show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.