​‘जिजाजी छत पर है’ या मालिकेत दिला जाणार हा सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 07:21 AM2018-04-25T07:21:08+5:302018-04-25T12:51:08+5:30

सोनी सबच्या ‘जिजाजी छत पर है’मध्ये पंचम (निखिल खुराणा)सह इलायची वेगवेगळी नाटके करून मनोरंजन करत आहे. समाजासाठी काही तरी ...

The social message that will be given in the series 'Jijaji Chhat On Hai' | ​‘जिजाजी छत पर है’ या मालिकेत दिला जाणार हा सामाजिक संदेश

​‘जिजाजी छत पर है’ या मालिकेत दिला जाणार हा सामाजिक संदेश

googlenewsNext
नी सबच्या ‘जिजाजी छत पर है’मध्ये पंचम (निखिल खुराणा)सह इलायची वेगवेगळी नाटके करून मनोरंजन करत आहे. समाजासाठी काही तरी मोठे आणि चांगले करून दाखविण्यासाठी पंचम इलायचीला (हिबा नवाब) प्रोत्साहन देणार असून मालिकेमध्ये लवकरच एक वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळणार आहे. 
पंचमने दिलेले आव्हान पूर्ण करण्याच्या या प्रक्रियेमध्ये हुशार इलायची एका योजनेसह चांदनी चौकमध्ये स्वच्छेतेचे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे. पण तिच्या या अभियानामुळे पंचमची चांगलीच फजिती होणार आहे. या मजेशीर कथेबद्दल पंचम ऊर्फ निखिल खुराणाने सांगितले, “मालिकेतील सध्याचा ट्रॅक हा खूपच मजेशीर आहे. याचे शूटिंग करत असताना आम्ही खूपच मजा केली. खरे तर हे सीन्स शूट करत असताना आम्ही सर्वच जण खूप हसत होतो. काम करताना आम्ही ज्याप्रकारे मजा केली, त्याचप्रकारे प्रेक्षकांनादेखील हे बघताना खूप मजा येईल अशी मला आशा आहे.”
हसते रहो इंडिया ही आपली टॅगलाईन कायम सत्यात उतरावी यासाठी सोनी सब एका नव्या आणि वेगळ्या बाजाची संकल्पना घेऊन प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असतं. जिजाजी छत पर है या मालिकेची कथा इलायची आणि पंचमच्या आयुष्याभोवती फिरते. हिबा नवाब या भूमिकेत इलायचीची भूमिका साकारत आहे. तिच्या नावाप्रमाणेच ती वेगळी आहे. ती काहीशी मस्तीखोर आहे. ती नेहमीच आपल्या मर्जीनुसारच जगते. तर निखिल खुराणा संगीत दिग्दर्शक बनण्याचे एकमेव स्वप्न असणारा लहान शहारातून आलेल्या पंचमची भूमिका साकारत आहे. संगीत क्षेत्रात जम बसवताना तो इलायचीच्या वडिलांना भेटतो. तो त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात करतो आणि त्यांच्या एक लहान खोलीमध्ये भाड्याने राहायला येतो. पण इथे आल्यानंतर इलायचीच्या रोजच्या खोड्यांना बळी पडतो अशी या मालिकेची कथा आहे.
जिजाजी छत पर है  ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेची कथा आणि या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. 

Also Read : सोनी सबच्या जिजाजी छत पर है मालिकेत हिबा नबाव आणि निखिल खुराना

Web Title: The social message that will be given in the series 'Jijaji Chhat On Hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.