प्रत्येकाला काही ना काही छंद किंवा आवड असते. सर्वसामान्य असो किंवा मग सेलिब्रिटी, सगळेच आपला छंद आणि आवड जोपासताना पाहायला मिळतात.कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. टीव्ही मालिकांमध्ये सशक्तपणे व्यक्तिरेखा साकार करण्याबद्दल विख्यात असलेली अभिनेत्री नेहा मार्दाने आजवर आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ही अभिनेत्री झी टीव्हीवर पुन्हा एकदा पुनरागमन करीत असून ती आगामी ‘क्यों रिश्तों में कट्टी-बट्टी’या मालिकेत शुभ्राची भूमिका रंगविणार आहे.

 शुभ्रा या पुण्यातील एका गृहिणीची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे.  लग्नापूर्वी डिझायनिंगच्या क्षेत्रात शुभ्राने अपूर्व यश मिळविलेले असते. तिच्या या गुणी व्यक्तिरेखेप्रमाणेच नेहामध्येही अनेक गुण आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात ती किती कुशल आहे, ते सर्वांनाच दिसत असले, तरी संगीताच्या क्षेत्रातही ती खूपच आहे, याची फारच थोड्यांना कल्पना असेल. किंबहुना इतकी वर्षे अभिनयाबरोबरच तिने आपली गाण्यची आवडही जपली असून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटसवर तिने अनेक लोकप्रिय गाण्यांचे मुखडे आपल्या आवाजात मुद्रित करून प्रसृत केले आहेत. शक्य होईल तिथपर्यंत आपण गाणं गाण्याचे सोडणार नाही, असे तिने म्हटले आहे.

नेहा म्हणाली, “गाणं हा केवळ छंद नाही, त्यापेक्षाही ते खूप काही अधिक आहे. तो माझ्याच व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. लहान असताना मी सर्व संगीतकारांची लोकप्रिय गाणी गात असे आणि तिथूनच गाण्याच्या छंदाशी माझं नातं जोडलं गेलं. त्यामुळे मला मन उल्हसित करायचं असेल किंवा मन शांत करायचं असेल, तर मी गाण्याचा आश्रय घेते.

गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या आवडत्या गाण्यांचे मुखडे गाऊन त्यांचं ध्वनिमुद्रण करीत आहे आणि ते माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसृतही करीत आहे. त्याद्वारे जगाने माझी गायनकला ऐकावी, अशी माझी इच्छा आहे. संगीतामुळे सर्व काही छान होतं, असं मझं मत आहे. त्यामुळे गाण्यांद्वारे मी इतरांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करीत आहे.”
 

Web Title: Singing has always been more than just a hobby, reveals Neha Marda-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.