Singer Ajay Gogavale.And Bella Shende will be together on the stage of 'Singing Star' after ten years! | 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर अजय आणि बेला येणार तब्बल दहा वर्षांनी एकत्र !

'सिंगिंग स्टार'च्या मंचावर अजय आणि बेला येणार तब्बल दहा वर्षांनी एकत्र !

छोट्या पडद्यावरील 'सिंगिंग स्टार' गाण्यांचा पहिला कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य स्वरूपात सादर होत असून अल्पावधीतच या कार्यक्रमाला रसिकांची भरघोस पसंती मिळत आहे.  छोट्या पडद्यावरचा ग्लॅमरस चेहरा म्हणजेच ऋता दुर्गुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत आहे. मध्यंतरी खास भाग रंगला सुबोध भावे, शुभांगी गोखले, मकरंद अनासपुरे, मुक्ता बर्वे, अभिज्ञा भावे, सई ताम्हणकर, सुमित राघवन, कविता लाड-मेढेकर, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी आपल्या स्पर्धक-मित्रांसाठी गाण्याच्या खास फर्माइशी पाठवल्या होत्या.अतिशय रंजक असा भाग पार पडला. 'सिंगिंग स्टार'मध्ये आरती वडगबाळकर, आस्ताद काळे, अभिजीत केळकर, अजय पुरकर, अंशुमन विचारे, अर्चना निपाणकर, गिरिजा ओक, पूर्णिमा डे, संकर्षण कऱ्हाडे, स्वानंदी टिकेकर, यशोमन आपटे हे स्पर्धक कलाकार आहेत.

अजय आणि अतुल या जोडीनं फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपल्या गाण्यांवर रसिकांना थिरकायला भाग पाडलं आहे. या अफलातून जोडीची सर्वच गाणी सुपर हीट आहेत! महाराष्ट्राची ही लाडकी जोडी  'सिंगिंग स्टार'च्या मंचावर आपली जुगलबंदी सादर करत रसिकांचे भरघोस मनोरंजन करणार आहेत. बेला शेंडे ही 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमात परीक्षक आहे. अजय आणि बेला यांनी तब्बल दहा वर्षांपूर्वी 'मथुरेच्या बाजरी' हे गाणं एकत्र गायलं होतं. त्यानंतर आज, दहा वर्षांनी त्यांनी 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर एकत्र गाणं गायलं आहे!

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मधले वीस दिवस 'सिंगिंग स्टार'चं चित्रीकरण बंद होतं आणि आता ते दणक्यात  सुरू झालं आहे  अजय-अतुलच्या आगमनानं...
'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या  विशेष पसंतीस उतरला आहे.  येत्या १८ तारखेच्या कार्यक्रमात अजय-अतुल संगीत सोहळा हा विशेष भाग असणार आहे. या विशेष भागात स्पर्धक सादर करणार आहेत अजय-अतुल यांची गाणी!!  इतक्या मोठ्या दिग्गजांसमोर सादरीकरण  करताना स्पर्धकांनामध्ये उत्साह आणि भीती असे मिश्र भाव आहेत. स्पर्धक आणि त्यांचे मेंटॉर यांनी अजय-अतुल यांच्यासाठी खास गाणी तयार केली आहेत.    


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Singer Ajay Gogavale.And Bella Shende will be together on the stage of 'Singing Star' after ten years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.