गायक आदित्य नारायणने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न झाल्यानंतर नवीन 5 बीएचके लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे.'इंडियन आयडॉल -13'चा होस्ट आदित्य पत्नी श्वेतासमवेत त्याच्या नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे.  आदित्यने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या नवीन फ्लॅटची खरी किंमतही उघड केली आहे. यासह तो म्हणाले की, त्याच्या घराची किंमत माध्यमांमध्ये कमी दाखवली गेली आहे. अलीकडेच अशा बातम्या आल्या होत्या की, आदित्यने श्वेतासाठी लक्झरी अपार्टमेंटसाठी 4 कोटी रुपये खर्च केले आहेत.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत आदित्यने सांगितले की, त्याच्या घराची किंमत 4 कोटी रुपये नाही. तो म्हणाला, 'हा हा, खूप कमी ? मार्केट प्राईज कमी लिहिली आहे. त्याची मूळ किंमत 10.5 कोटी आहे. मी लहान असल्यापासून काम करतोय.  तो पुढे म्हणाला, 'मला टेलिव्हिजनकडून बरेच पैसे मिळाले  आहेत'.

आदित्यने सांगितले की त्याचा नवा फ्लॅट आई-वडिलांच्या घरापासून तीन बिल्डिंग सोडून आहे. बॉलिवूड हंगामाशी बोलताना तो म्हणाले की, 'माझ्या घरापासून अवघ्या तीन बिल्डिंग सोडून अंधेरीमध्ये मी 5 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. आम्ही 3-4 महिन्यांत शिफ्ट होऊ. आमचा आई-वडिल अगदी हाकेच्या अंतरावर असतील. '

आदित्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या हनीमून प्लॅनबाबत सांगितले होते. यात खास बाब ही आहे की, तो एक नाही, दोन नाही तर तिनदा हनीमूनला जाण्यासाठी तयार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Singer aditya narayan says the price of the house has been undervalued in media reveals actual cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.