'Silent Girl' Sonakshi's funny answer to Ramayana question, netizens trolled her | KBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
KBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीचा ११ वा सीझन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सीझनचे आतापर्यंत दोन करोडपती सापडले आहेत. मात्र नुकताच पार पडलेला एपिसोड जास्त चर्चेत आला. याचं कारण म्हणजे या एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने हजेरी लावली होती. ती हॉट सीटवर बसलेल्या राजस्थानच्या रुमा देवी यांच्या मदतीसाठी केबीसीच्या सेटवर आली होती. यावेळी तिनं काही प्रश्नांची उत्तरं दिली मात्र एका सोप्या प्रश्नावर ती अडकली आणि यामुळेच तिला सोशल मीडियावर ट्रोलला सामोरं जावं लागलं.

नुकताच प्रसारीत झालेल्या राजस्थानच्या रुमा देवी हॉट सीटवर बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या मदतीसाठी सोनाक्षी या शोमध्ये पोहोचली. अमिताभ यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं तिनं बरोबर दिली. मात्र अमिताभ यांनी विचारलेल्या एका सोप्या प्रश्नावर मात्र ती अडकली तिला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. रामायणानुसार हनुमंताने कोणासाठी संजीवनी औषधी आणली होती, हा प्रश्न विचारला होता. मात्र सोनाक्षीला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. 


या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाक्षीची रिएक्शन पाहण्यासारखी होती.  या पर्यांमधून सोनाक्षीला अचूक पर्याय निवडता आला नाही.

शेवटी तिनं यासाठी लाइफलाइनचा वापर केला. मात्र एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यानं सोनाक्षीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
एका युजरनं लिहिलं, 'या स्टार किड्सना खरंच आपल्या संस्कृतीची माहिती नाही.' 

तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, मला वाटायचं की बॉलिवूडच्या इतिहासात अनन्या पांडे सर्वात खराब अभिनेत्री आहे मात्र आता सोनाक्षी माझं मत खोटं ठरवलं. असं करुन ती आता आलिया भट आणि अनन्या पांडे यांनाही टक्कर देत आहे.
या सर्व गोंधळात सोनाक्षी सोशल मीडियावर तर ट्रोल झालीच त्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही तिची शाळा घेतली. सोनाक्षीच्या वडीलांचं नाव शत्रुघ्न आहे. तिच्या काकांची नावं राम, लक्ष्मण आणि भरत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या घराचं नावही रामायण अशा तसेच तिच्या दोन्ही भावांची नावंही लव कुश अशी आहेत. मग सोनाक्षी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही असं अमिताभ यांनी म्हटलं. 


Web Title: 'Silent Girl' Sonakshi's funny answer to Ramayana question, netizens trolled her
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.