Siddharth Shukla's lip lock video with this actress is going viral, watch this video | सिद्धार्थ शुक्लाचा या अभिनेत्रीसोबतचा लिप लॉक व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

सिद्धार्थ शुक्लाचा या अभिनेत्रीसोबतचा लिप लॉक व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसचा १३वा सीझनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. त्याचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप आहे. विशेष म्हणजे बिग बॉस १३वा सीझन जिंकल्यानंतर तो जास्त लोकप्रिय झाला. सध्या तो फॅन टाइम एन्जॉय करतो आहे आणि त्याचा नवीन शो 'ब्रोकन बट ब्यूटीफुल ३' पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


'ब्रोकन बट ब्यूटीफुल ३'चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ शुक्ला सहकलाकार सोनिया राठीसोबत लिप लॉक करताना दिसतो आहे. निर्माती एकता कपूरने टीझरची एक झलक शेअर केली आहे. यात दोघे किस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सिद्धार्थचे चाहते हा व्हिडीओ सारखा सारखा पाहत आहे.


सिद्धार्थचे चाहते या व्हिडीओची क्लिप ट्विटरवर शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत. 'ब्रोकन बट ब्यूटीफुल ३' सीरिज ऑल्टबालाजीवर प्रदर्शित झाली आहे. ही रोमँटिक वेबसीरिज एकता कपूरने बनवली आहे. आधीच्या पहिल्या दोन यशस्वी सीझनमध्ये विक्रांत मेस्सी आणि हरलीन सेठी मुख्य भूमिकेत होते. सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे आणि त्याची खूप चर्चा होताना दिसते आहे.


एका युजरने सिद्धार्थ-सोनियाची ही क्लिप शेअर करत लिहिले की, अगस्त्य राव तू माझ्या मनात आग लावली. तुम्ही सफाई करून टाकली बॉस. 'ब्रोकन बट ब्यूटीफुल ३' हिट आहे डूड.

आणखी एका युजरने म्हटले की, आता आता एकता कपूर मॅमची स्टोरी पाहिली 'ब्रोकन बट ब्यूटीफुल ३'बद्दल मी एकाहून जास्त वेळ पाहिले. अभिनंदन सिद्धार्थ शुक्ला सर.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Siddharth Shukla's lip lock video with this actress is going viral, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.