छोट्या पडद्यावरील 'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'च्‍या नवीन सीजनमध्‍ये अलाद्दिन आणि साहसामधील त्‍याचा सोबती जिनू यांच्‍यामधील नात्‍याला गंभीर वळण आले आहे.  रसिकांना सर्वात थरारक साहसी कृत्‍यांचा मनोरंजन देणारी ही अविभाज्‍य जोडी आता मालिकेच्‍या नवीन सीजनमध्‍ये एकमेकांची प्रतिस्‍पर्धी बनली आहे. जिनूची निष्‍ठा आता साम्राज्‍याचा विध्‍वंसक दुष्‍ट जफरवर आहे. पण 'एकदा' जिवलग मैत्री असलेल्‍या या जोडीमध्‍ये पडद्यामागे देखील तितकेच दृढ नाते आहे का? पडद्यावर बरेच बदल करण्‍यात आले आहेत आणि सिद्धार्थ व राशुल यांच्‍या पडद्यामागील नात्‍याबाबत जाणून घेण्‍यासाठी उत्‍सुकता होती.  


सिद्धार्थ निगम अलाद्दिनची भूमिका साकारत आहे, तर राशुल टंडन जिनूची भूमिका साकारत आहे. या दोघांनीही मागील सीझनमध्‍ये प्रेक्षकांना त्‍यांच्‍या अतूट मैत्रीचे बंध दाखवले होते. दोघेही पडद्यावरील व पडद्यामागील त्‍यांच्‍या नात्‍याबाबत सांगण्‍यासाठी उत्‍सुक होते. राशुल म्‍हणाला, ''आम्‍ही या मालिकेसाठी आमची निवड झाल्‍यानंतर पहिल्‍यांदा एकमेकांना भेटलो. आमच्‍या प्रमुख भूमिका होत्‍या आणि म्‍हणूनच आम्‍ही एकमेकांची चांगली ओळख करून घेणे महत्‍त्‍वाचे होते. मला वाटते की,  आम्‍ही पहिल्‍यांदा भेटल्‍यानंतरच आमच्‍यामधील चांगल्‍या नात्‍याला सुरूवात झाली. सिद्धार्थ हा प्रतिभावान अभिनेता असून एक चांगला व्‍यक्‍ती देखील आहे.'' 

नवीन सीजनमधील अलाद्दिन व जिनू यांच्‍यामधील नवीन नात्‍याबाबत बोलताना सिद्धार्थ म्‍हणाला, ''अलाद्दिन व जिनू यांच्‍यामधील नाते पूर्णत: बदलले आहे. जिनू आता अलाद्दिनचा कट्टर शत्रू जफरचा निष्‍ठावान बनला आहे. अलाद्दिनला मदत करण्‍याऐवजी जिनू त्‍याच्‍या विरोधात कट-कारस्‍थान रचत आहे.''  शूटिंग संपल्‍यानंतर पडद्यावरील हे शत्रू वास्‍तविक जीवनात थट्टामस्‍करी करण्‍यामध्‍ये एकमेकांचे सोबती बनून जातात. राशुल म्‍हणाला, ''आम्‍ही जवळपास प्रत्‍येक दिवस एकत्र व्‍यतित करतो. मला आमच्‍या शूटिंगचा पहिला दिवस आठवतो. सलग १८ तास शूटिंग सुरू होते आणि मुसळधार पाऊस देखील पडत होता. दीर्घकाळापर्यंत शूटिंग सुरू असताना देखील आम्‍ही संपूर्ण टीमसोबत खूप धमाल केली. आम्‍ही ए‍कत्र येऊन आमच्‍या सह-कलाकारांची मस्‍करी करतो आणि असा एकही दिवस नाही की आम्‍ही सेटवर आहोत आणि आम्‍ही कोणाची थट्टामस्‍करी केली नसेल.'' 


याबाबत सिद्धार्थ म्‍हणाला, ''जिनू हा वास्‍तविक जीवनात माझा 'बडे भैय्या' आहे आणि नेहमीच तो माझा मोठा भाऊ असेल. मी मदतीसाठी प्रत्‍येक वेळी त्‍याच्‍यावर अवलंबून राहू शकतो. वास्‍तविक जीवनात देखील आमच्‍यामध्‍ये मालिकेमधील जिनू व अलाद्दिनप्रमाणे दृढ मैत्री आहे.'' राशुल मालिकेमधील कलाकारांच्‍या साहचर्याबाबत बोलताना म्‍हणाला, ''प्रतिभावान व सुंदर कलाकारांची टीम असल्‍यामुळे आम्‍ही खूप धन्‍य आहोत. सेटवर नेहमीच सकारात्‍मक उत्‍साह असतो.'' याबाबत सिद्धार्थ म्‍हणाला, ''प्रत्‍येक कलाकाराकडून काही-ना-काही शिकायला मिळते आणि मला या मालिकेचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे.'' 


Web Title: Siddharh Nigam and Raashul Tandon's bond off screen, on Sony SAB's Aladdin
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.