श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. या फोटोत पलकचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. 

पलक स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करत असल्याचे या फोटोत दिसत आहे. पूलमधील विविध पोज दिलेला हा तिचा फोटो सध्या नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.  ब्लॅक रंगातील स्विमविअर, झळाळी असलेली त्वचा आणि ग्लॅमरस अदा यामुळे या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

मुलगी पलकसह श्वेता तिवारीदेखील स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळतंय.ब्लॅक गॉगल्समध्ये श्वेताही सुंदर दिसत आहे. श्वेता तिवारीचे चाहत्यांसह टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार देखील या माय लेकींचा अंदाज पाहून त्यांचे कौतुक करत आहेत. लाईक्स आणि कमेंटस करत फोटोंना पसंती देत आहेत. 
 
आईप्रमाणेच पलकही मॉर्डन विचारांची आहे. मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरही ती नेहमीच आपल्या विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्याही फॉलोअर्सच्या संख्येत वाढ होत आहे. 

छोट्या पडद्यावर धुमाकुळ घातल्यानंतर श्वेता तिवारी एकता कपूरच्या ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. सिंगल पॅरेन्टची भूमिका तिने साकारली होती. या सीरिजमध्ये श्वेता आणि तिचा सहअभिनेता अक्षय ओबेरॉय यांची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. तिला तिच्याच वयाच्या व्यक्तीशी प्रेम होते. मात्र श्वेता एका मुलीची आई असते तर तिचा प्रियकर स्वत: तीन मुलांचा बाप असतो.

अभिनेत्री श्वेता तिवारी काही दिवसांपूर्वी तिचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता श्वेता व अभिनव दोघेही विभक्त झाले आहेत आणि श्वेता आपल्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळते आहे.तर पलकही बॉलिवूड डेब्युसाठी सज्ज आहे. 'रोझी' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shweta Tiwari's Daughter, Palak Tiwari shares her swimming pool pic will make you crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.