रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीने एक नाही तर दोन लग्न  केली. मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत. नुकताच श्वेताने पती अभिनव कोहलीलापासून वेगळी झाली आहे. 


घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदा श्वेता तिवारीने मौन सोडले आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अभिनव कोहली हा माझ्या आयुष्याला लागलेली एक कीड होती. त्याच्यापासून मी आता वेगळी झाल्यापासून मी खूप आनंदीत आहे. पतीपासून वेगळी झाल्यानंतर मी स्वतःला तंदरूस्त असल्याचे जाणवत असल्याचे श्वेताने सांगितले. 2013 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते.

 

दोघांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह केला होता. दोघांचा  वर्षांचा एक मुलगादेखील आहे. श्वेता आणि अभिनव दोघांच्या विभक्तीमागील कारण घरगुती हिंसाचार असल्याचे सांगितले जात आहे.


 तसेच श्वेताने सांगितले की, लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय करायचे आहे आणि कसे जगायचे आहे याचा विचार करणार आहे. लग्न आणि प्रेम हे दोन्ही विषय माझ्यासाठी आता पूर्णपणे संपले आहेत" श्वेताच्या पहिल्या लग्नाबाबतही असंच काहीसं घडलं होतं. पलक, श्वेताने तिवारी आणि राजा चौधरीची मुलगी आहे. राजा चौधरी दारूच्या नशेत श्‍वेताला मारहाण करायचा. त्यानंतर श्वेताने राजापासून घटस्फोट घेतला होता. 

Web Title: Shweta Tiwari, who explained for the first time after getting divorced from her second husband, knows why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.