ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत श्वेता घटस्फोटावर बोलली होती.

टीव्हीवर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी श्वेता तिवारी हिला कोण ओळखत नाही़. आज ती टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याच श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने राजा चौधरीसोबत लग्न केले. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला. पण हे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. नुकतीच श्वेता पती अभिनव कोहलीलापासून वेगळी झाली. दुसरा संसार मोडल्यावर श्वेताला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पण श्वेता खचली नाही. आता तर ती पुन्हा एकदा प्रेमात पडलीय. होय,  आपण पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचा खुलासा तिने केला आहे, तेव्हा सगळेच हैराण झाले .

होय, एका ताज्या मुलाखतीत श्वेता आपल्या खासगी आयुष्यावर बोलली, सध्या तू कोणाच्या प्रेमात आहे का, असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना श्वेताने होकारार्थी उत्तर दिले, होय, मी प्रेमात आहे. मी माझ्या दोन्ही मुलांच्या प्रेमात आहे, असे तिने सांगितले, मी सुरुवातीपासूनच माझ्या दोन्ही मुलांच्या (पलक आणि रेयांश) प्रेमात आहे.  आता दुस-या कोणत्या व्यक्तीसाठी अजिबात वेळ नाही. माझ्या मुलांवर माझे एवढे प्रेम आहे की मला त्यांच्या व्यतिरिक्त तिस-या कोणत्याच व्यक्तीची आता गरज वाटत नाही. माझ्या मुलांसोबत मी खूप खूश आहे, असे ती म्हणाली.

श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केले होते. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने अभिनव कोहलीशी लग्न केले मात्र तिचे हे लग्न सुद्धा जास्त काळ टिकू शकले नाही. राजा चौधरीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर अभिनवपासून रेयांश नावाचा एक मुलगा आहे.

रडत बसायला माझ्याकडे वेळ नाही
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत श्वेता घटस्फोटावर बोलली होती. घटस्फोटानंतर एका बाईला कुठल्या मानसिक आंदोलनातून जावे लागते, याची कल्पना तुम्ही करू शकता. मी सुद्धा या सगळ्यांतून गेले. पण सतत या घटस्फोटाबद्दल विचार करत बसायला, रडत बसायला माझ्याजवळ वेळ नाही. कारण माझ्या घरात मी एकटी कमावणारी आहे. त्यामुळे मी डिप्रेस होऊ शकत नाही. निश्चितपणे माझ्या आयुष्यातील हा कठीण काळ आहे. मात्र मला यातून बाहेर यावेच लागणार आहे. माझ्यावर अनेक जबाबदा-या आहेत. अनेक लोकांची मला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मी स्ट्रेस किंवा दु:खात राहू शकत नाही. माझी मुलगी माझा मुलगा आणि माझ्या संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे. घरात पुरूष आणि स्त्री दोन्ही मीच आहे. या काळात माझ्या मुलीने मला खूप साथ दिली. तिच्यामुळे मी तग धरू शकले. यातून बाहेर पडू शकले, असे ती म्हणाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shweta tiwari tells her new love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.