ठळक मुद्देश्वेता तिवारीने आधी भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केले होते. त्याच्यापासून तिला एक मुलगी आहे.

टीव्हीवर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी श्वेता तिवारी हिला कोण ओळखत नाही़. आज ती टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याच श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने राजा चौधरीसोबत लग्न केले. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला. पण हे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही.  नुकतीच श्वेता पती अभिनव कोहलीलापासून वेगळी झाली. दुसरा संसार मोडल्यावर श्वेताला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अलीकडे एका मुलाखतीत ती यावर बोलली.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, घटस्फोटानंतर एका बाईला कुठल्या मानसिक आंदोलनातून जावे लागते, याची कल्पना तुम्ही करू शकता. मी सुद्धा या सगळ्यांतून गेले. पण सतत या घटस्फोटाबद्दल विचार करत बसायला, रडत बसायला माझ्याजवळ वेळ नाही. कारण माझ्या घरात मी एकटी कमावणारी आहे. त्यामुळे मी डिप्रेस होऊ शकत नाही. निश्चितपणे माझ्या आयुष्यातील हा कठीण काळ आहे. मात्र मला यातून बाहेर यावेच लागणार आहे. माझ्यावर अनेक जबाबदा-या आहेत. अनेक लोकांची मला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मी स्ट्रेस किंवा दु:खात राहू शकत नाही. माझी मुलगी माझा मुलगा आणि माझ्या संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे.  घरात पुरूष आणि स्त्री दोन्ही मीच आहे. या काळात माझ्या मुलीने मला खूप साथ दिली. तिच्यामुळे मी तग धरू शकले. यातून बाहेर पडू शकले.

 श्वेताची मुलगी पलक ही सुद्धा आई श्वेताबद्दल बोलली.  माझी आई खूपच मजबूत स्त्री आहे. मला वाटतं, तिच्यासारख्या कोणत्याही महिलेला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. पण माझ्याने शक्य ती प्रत्येक गोष्ट मी माझ्या आईसाठी करणार आहे, असे ती म्हणाली.


 
श्वेता तिवारीने आधी भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केले होते. त्याच्यापासून तिला एक मुलगी आहे. पण मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर ती अभिनव कोहलीच्या प्रेमात पडली. दोघांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह केला होता.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shweta tiwari talks about life situation after separating from husband abhinav kohli-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.