ठळक मुद्दे‘मेरे डैड की दुल्हन’ या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची ‘मेरे डॅड की दुल्हन’ ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. या मालिकेत श्वेता लीड रोलमध्ये आहे. याच मालिकेत श्वेताचा एक को-स्टार आहे. 16 वर्षांपूर्वी तो श्वेताला एका मालिकेच्या सेटवर भेटला होता. आता हाच मुलगा श्वेताचा को-स्टार आहे. या मुलाचे नाव काय तर फहमान खान.
श्वेताने स्वत: एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.  तिने फहमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात 16 वर्षांपूर्वीचा फहमान आणि आत्ताचा फहमानअसे दोघेही दिसतेय.


हा फोटो शेअर करताना श्वेताने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘काळ कसा झपाट्याने निघून जातो, लक्षातही येत नाही. 2004 मध्ये मी या मुलाला भेटली होती. यानंतर आता 2020 मध्ये हा मला पुन्हा भेटला,’ असे श्वेताने हा फोटो शेअर करताना श्वेताने लिहिले आहे.
 फोटो पाहिला तर, १६ वर्षांनंतर श्वेता तिवारीचा को-स्टार फहमान खानमध्ये खूपच बदल झाला आहे. परंतु श्वेताच्या चेहºयावर मात्र बदलत्या काळाची कुठलीही खूण दिसत नाही. अभिनेत्री श्वेतासोबतचा फहमानचा हा फोटो २००४ मधील आहे.


तूर्तास फहमान व श्वेताच्या या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतोय. देखील केल्या आहेत. अनेक टीव्ही सेलिब्रिटींनीही यावर कमेंट्स केल्या आहेत.
 तो बदलला, पण तू मात्र आजही तशीच दिसतेस, असे अस्मित पटेलने लिहिले आहे. टीव्ही अ‍ॅक्ट्रेस निधी उत्तम हिने यावर कमेंट दिली आहे. ‘तू फहमानपेक्षा जास्त तरुण दिसत आहेस,’ असे तिने लिहिलेय.


‘मेरे डैड की दुल्हन’ या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये श्वेता तिवारी आणि वरुण बडोला लीड रोलमध्ये आहेत. त्यांच्याशिवाय अंजली ततरारीने वरुण बडोलाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. फहमान खानने  यात रणदीप नावाची भूमिका साकारत आहे. याआधी फहमानने वादा रहा, कुंडली भाग्य आणि क्या कसूर है अमाला का या मालिकेत काम केलेय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shweta tiwari shares 16 years old then and now picture of mere dad ki dulhan co-star fahmaan khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.