श्वेता तिवारी रूग्णालयात भरती, अभिनव कोहलीनं अशी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:35 AM2021-09-30T10:35:33+5:302021-09-30T10:35:48+5:30

Shweta Tiwari hospitalised : श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती रूग्णालयात आहे हे कळताच, चाहते काळजी करू लागले...

Shweta Tiwari Hospitalised Due To Weakness And Low Blood Pressure Ex-Husband Abhinav Kohli Reacts | श्वेता तिवारी रूग्णालयात भरती, अभिनव कोहलीनं अशी उडवली खिल्ली

श्वेता तिवारी रूग्णालयात भरती, अभिनव कोहलीनं अशी उडवली खिल्ली

Next
ठळक मुद्देमीडिया रिपोर्टनुसार, श्वेता लवकरच बिग बॉस १५ मध्ये सिनिअर स्पर्धक म्हणून दिसून येणार आहे.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची प्रकृती बिघडल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या एका रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान श्वेताची प्रकृती स्थिर आहे.
तिच्या टीमने एक स्टेटमेंट जारी करत ही माहिती दिली आहे.

‘श्वेता रूग्णालयात असली तरी ती ठीक आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. सततचा प्रवास, दगदग आणि हवामानातील बदल यामुळे कमी रक्तदाब आणि अशक्तपणा आल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या प्रकृतीबद्दल विचारणा करणारे असंख्य फोन आलेत. सर्वलोक श्वेता तिवारीच्या तब्बेतीबद्दल जाणून घेऊ इच्छित आहेत. सर्वांना सांगू इच्छितो, तिची प्रकृती आत्ता स्थिर आहे.  गेली अनेक दिवस विविध शोमध्ये सहभागी होत असल्यामुळे तिचा प्रचंड प्रवास झाला आहे  आणि त्यामुळेच तिच्या तब्बेतीवर हा परिणाम झाला आहे. या सर्व कारणामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे, ’ असे या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

अभिनव कोहलीनं उडवली खिल्ली

श्वेता तिवारी रूग्णालयात दाखल असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, तिचा पती अभिनव कोहली  (Abhinav Kohli ) याने एक पोस्ट शेअर करत, श्वेताची खिल्ली उडवली. इतकंच नाही तर वेट लॉसवरून तिला टोमणाही मारला.
त्याने पोस्टमध्ये लिहिले, ‘माझी व तिची कायदेशीर लढाई वेगळी आहे. देव करो, श्वेता लवकर बरी होवो. बिचारे कलाकार अधिक सुंदर दिसण्याच्या नादात जास्तच बॉडी बनवतात. नको इतकं कमी खातात आणि मग असे थकतात.’
अभिनव कोहली हा श्वेताचा दुसरा पती आहे. दीर्घकाळापासून दोघे वेगळे राहत आहेत. लग्नानंतर काही वर्षांत दोघांत मतभेद निर्माण झाले आणि 2019 मध्ये हा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला. यादरम्यान अभिनवला अगदी तुरूंगाची हवाही खावी लागली होती. श्वेता व अभिनव यांच्यात मुलगा रेयांशच्या कस्टडीवरून केस सुरू आहे. श्वेता तिवारी अलीकडे ‘खतरों के खिलाडी 11’च्या शूटींगसाठी केपटाऊनला गेली होती. तेव्हा अभिनवने तिच्यावर अनेक आरोप केले होते. श्वेता माझ्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून स्वत: केपटाऊनमध्ये मजा करतेय. माझ्या मुलाला तिने लपवून ठेवलं आहे. मी त्याला शोधण्यासाठी मुंबईतील सगळी हॉटेल्स पालथी घालतोय, असे त्याने म्हटलं होतं.

 

Web Title: Shweta Tiwari Hospitalised Due To Weakness And Low Blood Pressure Ex-Husband Abhinav Kohli Reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app