इतका ड्रामा का? पती अभिनव कोहलीचा ‘राडा’ पाहून श्वेता तिवारी भडकली 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 10:15 AM2021-05-09T10:15:27+5:302021-05-09T10:17:37+5:30

श्वेता तिवारी ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये झळकणार आहे. त्यासाठी ती केपटाऊनला रवाना झाली आहे. श्वेता केपटाऊनला पोहोचली ना पोहोचली तोच, तिचा पती अभिनव कोहली याने सोशल मीडियावर जबरदस्त राडा घातला.

shweta tiwari hits back on abhinav kohlis accusations says why he is doing drama | इतका ड्रामा का? पती अभिनव कोहलीचा ‘राडा’ पाहून श्वेता तिवारी भडकली 

इतका ड्रामा का? पती अभिनव कोहलीचा ‘राडा’ पाहून श्वेता तिवारी भडकली 

Next
ठळक मुद्देश्वेता तिवारीचे अभिनव कोहली सोबत हे दुसर लग्न आहे. मात्र या दोघांच्या नात्यात अडचणी आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ‘खतरों के खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. या शोसाठी श्वेता नुकतीच केपटाऊनला रवाना झाली. श्वेता केपटाऊनला पोहोचली ना पोहोचली तोच, तिचा पती अभिनव कोहली याने सोशल मीडियावर जबरदस्त राडा घातला.
एक व्हिडीओ शेअर करत,  त्याने श्वेतावर अनेक गंभीर उपस्थित केले आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या मुलासाठी चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साध्याण्याचा इशारा देखील दिला आहे.
हा व्हिडीओ पाहून खुद्द श्वेताही शॉक्ड झाली. ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल संताप व्यक्त केला.

काय म्हणाली श्वेता...
माझ्या केपटाऊन प्रवासाबद्दल अभिनवला सगळे माहित होते. रियांश कुठे आहे, हेही त्याला ठाऊक आहे. मी स्वत: त्याला फोन करून, मी केपटाऊनला जातेय आणि रियाशं माझ्या कुटुंबासोबत आणि मुलगी पलकसोबत असल्याचे सांगितले होते. पण असे असूनही सोशल मीडियावर तो इतका हाय होल्टेड ड्रामा का करतोय, मला ठाऊक नाही. यामागे त्याचा काय उद्देश आहे, हेच मला कळत नाही. हायकोर्टाच्या आदेशानुसार, तो रोज अर्धा तास आपल्या मुलाशी फोनवर बोलू शकतो. आम्ही त्यास मनाई करू शकत नाही. याऊपरही आपला मुलगा कुठे आहे माहित नाही, असा दावा तो करतोय. रियांशला मी माझ्यासोबत केपटाऊनला आणणार होते. पण अभिनवने त्यास मनाई केली. त्यामुळे मी त्याची मुंबईतच व्यवस्था केली. मी माझ्या मुलाची पूर्ण काळजी घेतेय आणि अभिनव तोच पिता आहे, जो आपल्या मुलाच्या पालन पोषणासाठी एक पैसाही देत नाही, अशा शब्दांत श्वेताने तिचा संताप व्यक्त केला.

अभिनवचा राडा

अभिनवने व्हिडीओ शेअर केला आहे, यात तो म्हणतो, श्वेता खातरों के खिलाडी मध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेली आहे. काही दिवसांपूर्वी तिने मला फोन करून याबद्दल माझे मत विचारलं होतं. मात्र मी यासाठी नकार दिला होता. तरीसुद्धा ती गेली. मात्र आत्ता माझा मुलगा कुठे आहे?  माहित नाही. तिने त्याला एका हॉटेलात ठेवले आहे. मी माझ्या मुलाचा फोटो घेऊन कालपासून प्रत्येक हॉटेलमध्ये फिरत आहे. मला अद्यापही काहीही माहिती मिळाली नाही, असा आरोप त्याने केला होता.

श्वेता तिवारीचे अभिनव कोहली सोबत हे दुसर लग्न आहे. मात्र या दोघांच्या नात्यात अडचणी आहेत. त्यामुळे ते एकमेकांपासून विभक्त राहतात. आणि मुलगा रियांशच्या कस्टडी साठी केससुद्धा लढत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shweta tiwari hits back on abhinav kohlis accusations says why he is doing drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app