ठळक मुद्देश्वेताने अनेक मालिकांमध्ये काम करण्यासोबतच बिग बॉस, झलक दिखला जा यांसारख्या शोमध्ये देखील भाग घेतला होता.

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत साकारलेल्या प्रेरणाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या लाइमलाईटपासून दूर आहे. पण आपल्या पर्सनल आयुष्यामुळे ती सतत चर्चेत असते. तूर्तास श्वेताने पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे.
श्वेताने दिलेल्या तक्रारीनुसार, अभिनवने तिची मुलगी पलक हिलाही मारहाण केली. यानंतर मायलेकींनी पोलिस ठाण्यात जावून तक्रार नोंदवली. दोघीही पोलिस ठाण्याबाहेर जोरजोरात रडताना दिसल्या.

स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, श्वेता व पलक अनेक दिवसांपासून अभिनवचे गैरवर्तन सहन करत होत्या. अभिनव पलकला वाट्टेल ते बोलायचा. अचानक त्याने पलकवर हात उचलला व श्वेता पोलिसांत पोहोचली. पण सरतेशेवटी श्वेताने हे प्रकरण आपसी सहमतीने सोडवण्याचा निर्णय घेतला.
तथापि एशियन एजने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी अभिनयविरोधात आयपीसीच्या कलम 354 ए (लैंगिक छळ), कलम 323 (जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवणे), कलम 504 (जाणीवपूर्वक अपमान करते), कलम 506 (धमकावणे) आणि कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल केलाआहे


मुलीला दाखवायचा अश्लिल फोटो
श्वेताने दिलेल्या तक्रारीुसार, 2017 मध्ये अभिनवने पलकला आपल्या मोबाईलमधील एका मॉडेलचा अश्लिल फोटो दाखवला होता.

श्वेता याआधीही ठरलीय घरगुती हिंसाचाराची बळी
श्वेताने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच  राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी श्वेता केवळ 19 वर्षांची होती. राजाने देखील काही चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. नच बलिये या कार्यक्रमात देखील ते दोघे एकत्र झळकले होते.
पण लग्नानंतर काहीच वर्षांत राजा आणि प्रेरणामध्ये सतत भांडणं होत होती. दारूच्या नशेत राजाने अनेकवेळा श्वेतावर हात उगारला होता. राजा मारहाण करतो, तसेच त्याने त्यांची मुलगी पलकला पळवण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला असे अनेक आरोप श्वेताने त्यावेळी केले होते. श्वेताने हे सगळे नऊ वर्षं सहन केले आणि नंतर या सगळ्या गोष्टींना कंटाळून 2007 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर पलकचा सांभाळ श्वेता करत आहे. श्वेता आणि राजा यांचा प्रेमविवाह होता. राजाशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असे श्वेताने बिग बॉसच्या घरात असताना सांगितले होते. 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. या दोघांना रियांश नावाचा एक मुलगाही आहे.


श्वेताने अनेक मालिकांमध्ये काम करण्यासोबतच बिग बॉस, झलक दिखला जा यांसारख्या शोमध्ये देखील भाग घेतला होता. जाने क्या बात हुई, सजन रे झुठ मत बोलो, परवरिश यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका देखील गाजल्या आहेत. तिने मालिकांप्रेमाणे काही चित्रपटांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. पण तिला छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर तिचे स्थान निर्माण करता आले नाही. 

English summary :
Actress Shweta Tiwari is accused husband Abhinav Kohli of domestic violence. Police have arrested Abhinav Kohli. Abhinav is Shweta's second husband. Abhinav also beat up his daughter Palak.


Web Title: Shweta Tiwari Files Police Complaint Against Husband Abhinav Kohli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.