एकता कपूरच्या मालिकेतून या अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण केले. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. आम्ही बोलतोय, अभिनेत्री श्वेता तिवारीबदल. श्वेता शेवटची बेगुसराय या मालिकेत दिसली होती. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार श्वेता 'मेरे डॅड की दुल्हन' मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतते आहे. यात ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार ही मालिका वडील - मुलीच्या नात्यावर आधारित आहे. मेकर्सनी अजून श्वेताबाबत अजून कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही. पण श्वेताचे चाहते ही बातमी वाचून नक्कीच खूष झाले असतील.   


 गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन सतत चर्चेत आहे. श्वेताचा पती अभिनव कोहली तिने  घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. यानंतर अभिनवला अटक करुन सोडून देण्यात आले होते. तर अभिनवच्या आईने लावलेले सगळे आरोप खोटे असल्याचे सांगत ती ही सगळं अभिनवपासून सुटका मिळवण्यासाठी करत असल्याचे सांगितले होते.  


अभिनव हा श्वेता तिवारीचा दुसरा पती आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच तिने राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी श्वेता केवळ 19 वर्षांची होती. राजाने देखील काही चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. नच बलिये या कार्यक्रमात देखील ते दोघे एकत्र झळकले होते. पण लग्नानंतर काहीच वर्षांत राजा आणि श्वेता सतत भांडणं होत होती.

दारूच्या नशेत राजाने अनेकवेळा श्वेतावर हात उगारला होता. 2007 मध्ये घटस्फोट घेतला. राजाशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असे श्वेताने बिग बॉसच्या घरात असताना सांगितले होते. 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. या दोघांना रियांश नावाचा एक मुलगाही आहे.. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shweta tiwari to do comeback on tv with a lead role in a serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.