श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडीओंमुळे ती सतत चर्चेत असते. पलक तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोवरुन तुमची नजर हटणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून पलकने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.


पलकने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पलक या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या फॅन्सना हे फोटोशूट खूपच आवडले आहे. फॅन्स यावर लाईक्स आणि कमेंट्स करतायेत. या फोटोंमध्ये पलकने सफेद रंगाचा शर्ट घातला आहे. कॅप्शनच्या जागी पलकने खूप सारे इमोजी शेअर केलेत. या फोटोंमध्ये तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.


पलक विवेक ओबेरॉयसोबत रोझी सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल रंडन मिश्रा यांनी केलं आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. त्याची कहाणी एका कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या मुलीची आहे जी अचानक शहरातून गायब होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shweta tiwari daughter palak tiwari bold photoshoot at beach video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.