shweta tiwari bold avtar in her new web series hum tum and them | ‘संस्कारी बहू’ श्वेता तिवारी झाली इतकी BOLD; ट्रेलर बघाल तर व्हाल थक्क!
‘संस्कारी बहू’ श्वेता तिवारी झाली इतकी BOLD; ट्रेलर बघाल तर व्हाल थक्क!

ठळक मुद्देया सीरिजशिवाय श्वेता सोनी टीव्हीवरच्या ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेतही दिसते आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी काही दिवसांपूर्वी तिचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता श्वेता व अभिनव दोघेही विभक्त झाले आहेत आणि श्वेता आपल्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळते आहे. यादरम्यान श्वेता नव्या दमाने छोट्या पडद्यावर परतली आहे. शिवाय डिजिटल जगातही तिचा डेब्यू झाला आहे. अल्ट बालाजीच्या ‘हम तुम अँड देम’ या वेबसीरिजमध्ये श्वेता लीड रोलमध्ये आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आणि ते पाहून अनेकांना धक्का बसला.

होय, या वेबसीरिजमध्ये श्वेता कधी नव्हे इतकी बोल्ड दिसते आहे. तिचे अनेक लिपलॉक सीन पाहायला मिळत आहेत. एकता कपूरची ही वेबसीरिज रोमान्सचा तडका असलेली एक फॅमिली ड्रामा आहे.  या वेब सीरिजमध्ये अभिनेत अक्षय ओबेरॉय हा श्वेता तिवारीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. श्वेताने  अक्षय ओबेरॉयसोबत अतिशय बोल्ड इंटिमेट सीन्स दिले आहेत. ट्रेलरमध्ये याची झलक तुम्ही पाहू शकता.


 ट्रेलरनुसार श्वेता तिवारी या वेब सीरिजमध्ये एका ‘बेचैन’ आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अक्षय एका बेजबाबदार वडीलांच्या रुपात दिसणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून श्वेता तिवारीने पहिल्यांदाच कॅमे-यासमोर इंटिमेट सीन दिले आहेत. ही वेबसीरिज येत्या 6 डिसेंबरला रिलीज हेणार आहे.
या सीरिजशिवाय श्वेता सोनी टीव्हीवरच्या ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेतही दिसते आहे.

Web Title: shweta tiwari bold avtar in her new web series hum tum and them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.