नव्या मालिकेची उत्सुकता शिगेला; पण ‘ही’ जुनी मालिका लवकरच घेणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:39 PM2021-06-24T12:39:58+5:302021-06-24T12:44:23+5:30

कोरोना महामारीनंतर आता सगळे काही न्यू नॉर्मल होत असताना मनोरंजन विश्वातही नवी लगबग सुरू झालीये. काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर काही जुन्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत....

Shrimanta Gharchi Suun is going off , Ajunahi Barsaat Aahe is going to launch soon | नव्या मालिकेची उत्सुकता शिगेला; पण ‘ही’ जुनी मालिका लवकरच घेणार निरोप

नव्या मालिकेची उत्सुकता शिगेला; पण ‘ही’ जुनी मालिका लवकरच घेणार निरोप

Next
ठळक मुद्देमुक्ता बर्वे आणि उमेश कामत या दोन्ही कलाकारांनी छोटा पडदा देखील गाजवला आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकं रखडलीत. पण आता सगळे काही न्यू नॉर्मल होत असताना मनोरंजन विश्वातही नवी लगबग सुरू झालीये. अशात काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर काही जुन्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. नव्या मालिकेबद्दल बोलायचे तर  ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunahi Barsaat Aahe) ही मालिका येत्या 12 जुलैपासून छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीस येतेय. या मालिकेच्या निमित्ताने दोन मोठे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. होय, उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडी या मालिकेत दिसणार आहे.

या मालिकेचा प्रोमो रिलीज झालाय आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही नवी मालिका येणार असताना एक जुनी मालिका संपणार आहे. या मालिकेचे नाव आहे, ‘श्रीमंताघरची सून’ (Shrimanta Gharchi Suun). होय, ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे.  मालिकेतील मुख्य अभिनेत्री रुपल नंद ( Rupal Nand)  हिने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

‘श्रीमंताघरची सून’ ही मालिका संपणार आहे का? असा प्रश्न एका चाहत्याने केला असता, होय पण तुम्ही ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका पाहू शकणार आहात, असे उत्तर रूपलने दिले.

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या दोन्ही कलाकारांनी छोटा पडदा देखील गाजवला आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत मुक्ताला तुफान प्रतिसाद मिळाला होता. तर उमेश कामत देखील वादळवाट, असंभव, शुभं करोति, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत सुपरहीट ठरला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते टेलिव्हिजन क्षेत्रापासून दूर होते. त्यामुळे नव्या मालिकेतून मुक्ता आणि उमेशची जोडी रसिकांच्या भेटीला येणार असल्याने सारेच खूप उत्सुक आहेत.

Web Title: Shrimanta Gharchi Suun is going off , Ajunahi Barsaat Aahe is going to launch soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app