चित्रीकरण सुरु होण्याआधी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' सेटवर घडला धडकी भरवणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:36 PM2021-10-21T12:36:20+5:302021-10-21T12:43:17+5:30

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि. मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे रसिकांची आवडती मालिका बनली आहे.

shocking incident took place on the set of tujhya majhya sansarala aani kay hava Serial | चित्रीकरण सुरु होण्याआधी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' सेटवर घडला धडकी भरवणारा प्रसंग

चित्रीकरण सुरु होण्याआधी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' सेटवर घडला धडकी भरवणारा प्रसंग

Next

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि. मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे रसिकांची आवडती मालिका बनली आहे. अल्पावधीतच मालिकेने रसिकांची पसंती मिळवली आहे.या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.  यावेळी मात्र मालिका चर्चेत येण्याचे कारण म्हणजे मालिकेच्या सेटवर दाखल झालेला एक पाहुणा आहे. अर्थात या पाहुण्याच्या अनपेक्षित एण्ट्रीने अनेकांना धडकीही भरली. शुटिंग सुरु होण्याआधी या मालिकेच्या सेटवर बिबट्या आल्यामुळे सेटवर भितीचे वातावरण पाहायला मिळाले.काही वेळातच तो बिबट्या सेटवरुन निघून गेला. 

सिनेमा असो किंवा मालिकांचे शूटिंगसाठी जंगल भाग असणाऱ्या  ठिकाणीच सेट लावले जातात. मुंबई असो किंवा मग मुंबई बाहेर होणारे शूटिंग हे शहराबाहेर होत असतात. अशा ठिकाणी शूटिंग करणे थोडे रिस्कच असते. अनेकदा अशा परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात.जंगल परिसरात बिबट्याची दहशत नवीन नाही. बिबट्याचा वावर पाहायला मिळाल्याच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे शूटिंगसाठी येणारे कलाकार, युनिटचे कर्मचारी यांच्याही मनात सतत भीती असते. अनेकदा मालिकांच्या सेटवर  अधूनमधून बिबट्या येत असल्याचे ऐकायला मिळते.

सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी  देणारी ही मालिका आहे, त्यामुळे त्यातील सगळीच पात्र प्रेक्षकांना भावत आहेत.या मालिकेचं चित्रीकरण सध्या नाशिक मध्ये सुरु आहे. या मालिकेचं चित्रीकरण सुरु होण्याआधी काही काळ सेटवर बिबट्याचा वावर होता. हा बिबट्या तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. यावर मालिकेत एक सीन पण शूट करण्यात आला आहे, ज्यात सिद्धार्थ अदितीचं बिबट्यापासून रक्षण करतो. हा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Web Title: shocking incident took place on the set of tujhya majhya sansarala aani kay hava Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app