ससुराल सिमर का फेम बालकलाकार शिवलेख सिंगवर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. या अपघातात  शिवलेखच्या आई-बाबांनादेखील गंभीर दुखापत झाली आहे. 


टाईम्सच्या रिपोर्टनुसार  शिवलेखचे वडील म्हणाले, तो आमचे एकुलता एक मुलगा होता. मला नाही माहिती की, देव ऐवढा निर्दयी कसा असू शकतो ?, का निर्दोष लोक मारले जातात. या अपघातात आमच्या ड्रायव्हरला देखील दुखापत झाली होती तसेच मला आणि माझ्या पत्नीला देखील. ते पुढे म्हणाले, ज्यावेळी मी शुद्धीत आलो तेव्हा माझा मुलगा या जगात नव्हता. मला नाही माहिती त्याला कधी दुखापत झाली. आम्ही बिलासपूरला इंटरव्हुसाठी नाही तर पर्सनल कामासाठी जात होतो. 

शिवलेखचे वडील पुढे म्हणाले, या अपघातात चुकी ट्रक ड्रायव्हरची होती. मला नाही माहिती की त्याला अटक झाली आहे की नाही. शिवलेखाने शेवटचे मला सांगितले होते की त्याची जास्त वेळ रायपूरमध्ये राहण्याची इच्छा होती.  

 


शिवलेख आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत बिलासपुरवरून रायपूरला जात होता. या दरम्यान त्यांच्या कारची टक्कर एक ट्रकशी झाली. या भीषण अपघातात शिवलेखचा जागावरच मृत्यू झाला. 


 शिवलेखने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यात संकटमोचन सोनी टिव्हीवरील हनुमान, बालवीर, खिडकी आणि कलर्सवरील ससुराल सिमर का सारख्या मालिका सहभागी आहेत. तसेच तो झी-टिव्ही इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकला होता. तो रेमो डिसूझाच्या आगामी सिनेमात देखील काम करत होता. या सिनेमाचे 90 टक्के शूटिंग पूर्ण देखील झाले आहे. 


Web Title: Shivlekh singh last rites done father says why god is so cruel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.