झी मराठी वरील 'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ही मालिका ७ ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या  या मालिकेतील शिवानीची व्यक्तिरेखा शीतली पेक्षा अगदी वेगळी आहे. इतकंच नव्हे तर खऱ्या आयुष्यात देखील शिवानी आणि या व्यक्तिरेखेमध्ये काही साम्य नाही आहे.

तिच्या या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, "अल्टी पल्टी या मालिकेमधील पल्लवी ही खूपच वेगळी आहे. तिला टिपिकल आयुष्य जगायचं नाही आहे आणि समाजाने घालून दिलेल्या चौकटींमध्ये तिला नाही राहायचं आहे. त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. तिचा हेतू वाईट नाही आहे आणि तिच्यामुळे चांगल्या लोकांना कधीच नुकसान होणार नाही.

पल्लवी लोकांना तिच्या बोलण्यात रमवून ठेवू शकते. खऱ्या आयुष्यात मी कधीच कोणाला शेंडी लावलेली नाही कारण मला मुळातच खोटं बोलणं जमत नाही. मी कधी खोटं बोलली तर मला समोरून लोक मला सांगतात कि तुला खोटं बोलता येत नाही आणि ते तुझ्या चेहऱ्यावर दिसून येतं. मी कधीच खोटं बोलून संकटाला निमंत्रण देत नाही कारण जर मी खोटं बोलली तर मला स्वतःला ते काही काळाने लक्षात राहणार नाही."

Web Title: Shivani baokar said "I cant lie to anyone "

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.