Shilpa Shetty's Secret, shared by Diler Mehndi in the Super Dancer program | सुपर डान्सर या कार्यक्रमात दलेर मेहंदीने शेअर केले शिल्पा शेट्टीचे सिक्रेट

सुपर डान्सर या कार्यक्रमात दलेर मेहंदीने शेअर केले शिल्पा शेट्टीचे सिक्रेट

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ पॉप स्टार मिका सिंगने नुकतीच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या किड्स डान्स रिऍलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर २ ला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. दलेर मेहंदी आणि शिल्पा शेट्टी हे अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत आहेत. त्यामुळे ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दोघे अनेक दिवसांनंतर एकमेकांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दलेर मेहंदी यांनी शिल्पासोबतच्या अनेक आठवणी यावेळी उपस्थितांना सांगितल्या. शिल्पा आणि दलेर मेहंदी बोस्टनला गेले असता घडलेला किस्सा ऐकून उपस्थितांना त्यांचे हसू आवरत नव्हते.
दलेर मेहंदी यांनी सुपर डान्सर चॅप्टर २ या कार्यक्रमात एका दौऱ्याच्या वेळेचा प्रसंग सांगितला. ते सांगतात, १९९८ मध्ये दलेर मेहंदी आणि शिल्पा शेट्टी बोस्टनमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र गेले होते. तेव्हा तिथे खूप धावपळ सुरू होती. तिथे त्यांना दररोज हॉटेल बंद होण्याआधी जेवणाची ऑर्डर द्यावी लागत असे. त्यामुळे ते ज्यावेळी जेवायला बसत असत, त्यावेळी त्यांचे जेवण अतिशय थंड होत असे. शिल्पा त्यावेळी ते जेवण कशाप्रकारे गरम करत असे हे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ती हेअर ड्रायरच्या गरम हवेने अन्न गरम करत असे. जेवण गरम ठेवण्यासाठी तिने एक अद्वितीय मार्ग शोधला होता. शिल्पा हेअर ड्रायरने जेवण गरम करतेय हे ऐकून आम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
सुपर डान्सर चॅप्टर या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या सिझनमधील चिमुकले स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे कोणता स्पर्धक या कार्यक्रमात बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. 

Also Read : गणेश आचार्यने एकावेळी खालल्या होत्या २०० इडल्या

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shilpa Shetty's Secret, shared by Diler Mehndi in the Super Dancer program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.