'बिग बॉस' फेम 'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवाला (Shefali Jariwala)  ने 2004 मध्ये मीत ब्रदर्समधील हरमीत सिंग (Harmeet Singh) शी लग्न केले होते. पण लग्नाच्या 9 वर्षानंतर शेफालीने हरमीतपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांचं नातं वाईट पद्धतीने संपलं. त्यानंतर शेफालीने हरमीतवर गंभीर आरोप केले होते. 2014 मध्ये तिने पराग त्यागीशी लग्न केले. त्यानंतर शेफालीने आपल्या पहिल्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. शेफाली म्हणते की, प्रत्येक वैवाहिक जीवनात घरगुती हिंसाचार शारीरिक असणे गरजेचा नसतो. बर्‍याच वेळा 'मानसिक हिंसाचार'ही त्रासदायक असतो. 


'टाइम्स नाऊ' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ती हरमीतसोबत खुश नव्हती. लग्न तिच्यासाठी अत्याचारासारखे होते, जिथे दररोज ती मानसिक हिंसाचाराची शिकार होत होती. शेफाली सांगते, 'मी एक स्वतंत्र स्त्री आहे. मी कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हते. म्हणूनच त्या वेदनादायक नात्यातून बाहेर पडण्याची ताकद मला मिळाली. '

शेफाली म्हणाली, "तुमचे मूल्य नाही हे समजणे फार महत्वाचे आहे. प्रत्येक हिंसा शारीरिक नसते. दुःखी आयुष्यामागील मानसिक हिंसा हे देखील एक मोठे कारण असू शकते. मला वाटतं की मी, त्या नात्यातून बाहेर पडले कारण मी स्वतंत्र होते. मी स्वतः कमावायचे. आपल्या समाजात घटस्फोट हा निषिद्ध मानला जातो.

हरमीतसोबत घटस्फोट झाल्यावर परागशी केलं लग्न 
शेफाली पुढे म्हणाली, "आपण समाजाचा  इतका विचार का करतो?" आपल्यासाठी योग्य ते आपण केले पाहिजे. मी माझ्या आयुष्यात हा निर्णय घेण्यास सक्षम होतो आणि मला त्यास पाठिंबा मिळाला. ' हरमीतपासून घटस्फोट घेतल्यानंतर शेफालीला 'प्रिती रिश्ता' आणि 'जोधा अकबर' सीरियल फेम पराग त्यागीच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केले.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shefali jariwala opens up about divorce mentally violent first marriage with harmeet sing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.