Shanaya-Radhika will teach a lesson to gurunath in mazya navryachi bayko serial gda | 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये गुरूला धडा शिकवून शनाया-राधिका उभारणार विजयाची गुढी ?

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये गुरूला धडा शिकवून शनाया-राधिका उभारणार विजयाची गुढी ?

झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. या मालिकेसोबतच या मालिकेतील मुख्य पात्रांनीदेखील रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. आहे. गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.


या मालिकेने एक विलक्षण वळण घेतलं आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिल्या प्रमाणे माया गुरूच्या सांगण्यावरून राधिकाला ब्लॅकमेल करतेय. पण शनायामुळे राधिकाला गुरूचा सगळा प्लॅन कळतो. शनाया राधिका एकमेकेंची माफी मागतात आणि एकत्र येऊन गुरूला धडा शिकवायचं ठरवतात. त्यानुसार दोघीपण आता गुरूच्या प्रेत्येक छोट्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. मायाला आपल्या बाजूने करून गुरूला चांगलाच धडा शिकवायचा असा राधिकाचा प्लॅन आहे. गुडीपाडव्याच्या दिवसापासून राधिका आणि शनाया गुरूला हरवण्याचा दिशेने एक एक पाऊल उचलणार आहेत. या दोघी गुरूला कशी अद्दल घडवणार आहे. 

Web Title: Shanaya-Radhika will teach a lesson to gurunath in mazya navryachi bayko serial gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.