shanaya love her more than gary | शनायाला गॅरीपेक्षा प्रिय आहे 'ही' व्यक्ती

शनायाला गॅरीपेक्षा प्रिय आहे 'ही' व्यक्ती

ठळक मुद्दे मांजर रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेली तिला सापडली

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' लोकप्रिय मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री इशा केसकरचं प्राणीप्रेमही जगजाहीर आहे. अलीकडेच तिनं एका मांजरीचे प्राण वाचवले. तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका स्टोरीमधून ते कळलं. एका मांजरीचा व्हिडिओ तिनं पोस्ट केला होता. ही मांजर रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेली तिला सापडली. इशा लगेच तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. काही वेळानं ती मांजर ठीक असल्याचं तिनं पोस्टद्वारे कळवलं. इतकंच नव्हे तर इशाने त्या मांजरीला तिच्या परिवाराकडे सोडलं. मालिकेत गॅरी आणि राधिकाला त्रास देणारी शनाया खऱ्या आयुष्यात मात्र प्राण्यांच्याबाबतीत खूप हळवी आहे. इशाचं प्राणीप्रेमी हे तिच्या सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना दिसतं. ती सोशल मीडियावर प्राण्यांसोबत अनेक फोटोज अपलोड करते आणि तिचे चाहते तिच्या या फोटोजना भरभरून प्रतिसाद देखील देतात. 


दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. काही महिन्यापूर्वी  रसिका सुनीलच्या जागी अभिनेत्री इशा केसकरने शनाया म्हणून मालिकेत एंट्री केली आहे. शनाया ही व्यक्तिरेखा या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. 
 

Web Title: shanaya love her more than gary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.