SHAKTIMAAN'S GEETA VISHWAS CHANGED, HER HOT LOOK WOULD HAVE CLEAN BOLD GANGADHAR | 'शक्तीमान'मधील 'गीता विश्वास'चा इतका बदलला लूक तिला तुम्ही ओळखू शकणार नाही !

'शक्तीमान'मधील 'गीता विश्वास'चा इतका बदलला लूक तिला तुम्ही ओळखू शकणार नाही !

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे शक्तीमान. शक्तीमान ज्या तरुणीवर प्रेम करायचा ती एक रिपोर्टर होती आणि तिचं नाव गीता विश्वास असं होतं. शक्तीमान मालिकेतील भूमिकेमुळे अभिनेता मुकेश खन्ना यांना जितकी लोकप्रियता आणि प्रेम मिळालं तितकंच रसिकांचं प्रेम गीता विश्वास ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवी महंत हिलाही मिळालं. शक्तीमान, गंगाधार आणि गीता विश्वास या व्यक्तीरेखांनी रसिकांवर जादू केली. त्यामुळे नव्वदच्या दशकात या मालिकेने  लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठलं होतं. 


कधी कुणी शक्तीमानच्या रुपात दिसायचं तर कुणी गंगाधर तर कुणी गीता विश्वासच्या रुपात दिसायचं अशी क्रेझ या मालिकेची सर्वसामान्यांवर पाहायला मिळत होती. शक्तीमान मालिकेला आता बरीच वर्षे लोटली आहेत. शक्तीमान साकारणा-या मुकेश खन्ना यांचंही वाढलेलं वय त्यांच्या केस आणि चेह-यावरुन सहज लक्षात येते. मात्र गीता विश्वास साकारणा-या वैष्णवी महंतबाबत वयाचा काटा बहुदा उलट्या दिशेने फिरतो आहे. कारण तिचं सध्याचं सौंदर्यं पहिल्यापेक्षा अधिक घायाळ करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. वैष्णवी महंत सुंदर तर दिसतेच आहे शिवाय तिच्या अदा तितकाच ग्लॅमरस अंदाज काही दिवसांपूर्वी वैष्णवी महंतचे एक फोटोशूट समोर आले होते.  


शक्तीमान या मालिकेनंतर वैष्णवीने विविध मालिकांमध्ये काम केलंय. मिले जब हम तुम, सपने सुहाने लडकपन के, टशन-ए-इश्क या मालिकांमधील वैष्णवीच्या भूमिकांची चर्चा झाली. 1988 पासून विविध मालिका आणि सिनेमात तिने काम केले आहे. बंबई के बाबू या सिनेमातही तिने आपल्या अभिनयासह सौंदर्याची जादू दाखवली होती. याशिवाय लाडला सिनेमातही तिने भूमिका साकारली होती. 

Web Title: SHAKTIMAAN'S GEETA VISHWAS CHANGED, HER HOT LOOK WOULD HAVE CLEAN BOLD GANGADHAR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.