Shahrukh Khan wants to once again acknowledge the role of the military, expressed on 'Dance + 2' stage | शाहरूख खानला पुन्हा एकदा साकारायची आहे 'फौजी'ची भूमिका, 'डान्स +५'च्या मंचावर व्यक्त केली इच्छा
शाहरूख खानला पुन्हा एकदा साकारायची आहे 'फौजी'ची भूमिका, 'डान्स +५'च्या मंचावर व्यक्त केली इच्छा


स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो 'डान्स +५' मधील स्पर्धकांनी त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली आहेत. स्पर्धा दिवसेंदिवस अटीतटीची होत असून प्रत्येक जण आपले १००% प्रयत्न देऊन स्पर्धा जिंकण्याची तयारी करत आहे. ट्रॉफीवर आपलं नाव असावं यासाठी पप्रत्येकजण मेहनत घेत आहे. या आठवड्यात भीमने आपल्या परफॉर्मन्सने शाहरूख खानना प्रेरित केले. 

'डान्स +५' शोमधील हा आठवडा एकदम धमाकेदार असणार आहे कारणच तसे आहे, शाहरूख खान प्रजासत्ताक दिनाच्या खास भागात भेट देणार आहेत. शाहरूख खानने त्याची कारकीर्द फौजी या टीव्ही मालिकेने केली हे सर्वांनाच माहीत आहे. अशाच एका फौजीने म्हणजेच भीमने त्यांना प्रेरित केले आहे. भीमने एक व्हिलन या चित्रपटातील बंजारा या गाण्यावर नृत्य सादर केले.

यावर  देताना शाहरूख खान यांनी सर्वप्रथम भीमचे देशाचे संरक्षण करत असल्याबद्दल धन्यवाद दिले. तसेच आपल्या वरिष्ठांकडून डान्स+ मध्ये भाग घेण्यासाठी परवानगी मागणे हा धाडसी निर्णय आहे असेही ते म्हणाले. त्यांनी भविष्यात पुन्हा एकदा  'फौजी' ची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना कधी संधी मिळाली तर ते भीमसारखे नाचायला शिकतील असेही म्हणाले.


धमाकेदार परफॉर्मन्स आणि सर्व मस्ती 'डान्स +५' या शनिवार आणि रविवार रात्री ८.००  वाजता फक्त स्टार प्लस वर पहा.

Web Title: Shahrukh Khan wants to once again acknowledge the role of the military, expressed on 'Dance + 2' stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.