On the set of 'Om Shanti Om', Kanika Kapoor sat in a surprise | ‘ओम शांती ओम’च्या सेटवर कनिका कपूरला बसला आश्चर्याचा धक्का

‘ओम शांती ओम’च्या सेटवर कनिका कपूरला बसला आश्चर्याचा धक्का

‘बेबीडॉल’ हे गाणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. हे गाणे, या गाण्यातील सनी लिओनीचा डान्स प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या गाण्याची गायिका कनिका कपूरला देखील या गाण्यामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. कनिका आता प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळत आहे. ती सध्या एका रिअॅलिटी शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.
‘स्टार भारत’ या वाहिनीवरील ‘ओम शांती ओम’ या भक्तिसंगीतावरील रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात कनिका कपूर परीक्षकाची भूमिका साकारत आहे. अलीकडेच या कार्यक्रमाच्या सेटवर कनिकाला तिच्या मुलांना आणि आई-वडिलांना पाहून आश्चर्याचा धक्का बसला. कारण ते सर्वजण तिला भेटण्यासाठी थेट लंडनवरून मुंबईला आले होते. याबद्दल कनिका सांगते, “मी सध्या माझ्या गाण्याच्या रेकॉर्डिंगमध्ये खूपच व्यग्र आहे. तसेच त्यातून वेळ काढून मी ‘ओम शांती ओम’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमात काम करायला मला खूप मजा येतेय. छोट्या पडद्यावर काम करण्याचा माझा पहिलाच अनुभव असला तरी मी ते खूप एन्जॉय करत आहे. या कार्यक्रमाचा अनुभव माझ्यासाठी उत्कंठावर्धक तसाच आव्हानात्मकही आहे. इतक्या धावपळीच्या वेळापत्रकामुळे मला कोणत्याच गोष्टीला सध्या वेळ देता येत नाहीये. पुरेशी झोप घेण्यासही माझ्याकडे वेळ उरलेला नाही. मी मुंबईत तर माझे कुटुंबीय लंडनला असते. मला माझ्या कुटुंबियांची फार आठवण येते. मला माझ्या पालकांना भेटायचे होते. मुलांना जवळ घ्यायाचे होते. पण माझ्या व्यग्र शेड्युलमुळे त्यांना भेटायला जाणे मला जमत नव्हते. पण ‘ओम शांती ओम’ या कार्यक्रमाच्या सेटवर माझ्या आई-वडिलांनी आणि मुलांनी येऊन मला खूपच चांगले सरप्राईज दिले. माझ्या कार्यक्रमाच्या टीमने हे कसे काय घडवून आणले, ते मला ठाऊक नाही. पण ज्यांनी हे घडवून आणले, त्या संपूर्ण टीमची मी मनापासून आभारी आहे.
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि गायक-संगीतकार शेखर रावजीयानी हे देखील या कार्यक्रमात कनिकासोबत परीक्षकाच्या भूमिकेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपारशक्ती खुराणा करत आहे.

Also Read : ​कोण आहेत बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि बोल्ड गायिका जाणून घ्या

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: On the set of 'Om Shanti Om', Kanika Kapoor sat in a surprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.