बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे. स्टार पॅरेंट्सपेक्षाही अधिक स्टार किड्स पॉप्युलर होत आहेत. याच यादीत बिग बॉस विजेती श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आहे. पलक हीसुद्धा सैफ-अमृताची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांच्याप्रमाणे बॉलिवूड डेब्यूवरून चर्चेत आहे. विशेष पलकचे चाहतेही तिला पडद्यावर बघण्यास उत्सुक असल्याने ती केव्हा डेब्यू करणार याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागून आहे. पलक तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. 

काही दिवसांपूर्वीच मम्मी श्वेता तिवारीने मुलगी पलकचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पलक तिचा नऊ महिन्यांचा भाऊ रेयांशची काळजी घेताना दिसत आहे. फोटोवरून पलक तिच्या भावावर प्रचंड प्रेम करीत असून, मम्मी श्वेताप्रमाणेच ती भावाची काळजी घेत असल्याचे दिसून येते. श्वेताने राखीपौर्णिमेच्या दिवशी पलक आणि रेयांशचा एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये पलक अतिशय प्रेमाने आपल्या नऊ महिन्यांच्या भावाला राखी बांधताना दिसत आहे. 

रेयांशचा हा पहिलाच राखीपौर्णिमेचा सण होता. त्यामुळे पलकने त्यास अधिकाधिक अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. पलकला फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करायला खूप आवडतात. याची झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बघावयास मिळत असते. वास्तविक पलक सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असून, तिच्या फॅन फॉलोइंगची संख्या प्रचंड आहे. पलक राजा चौधरी आणि श्वेता तिवारीची मुलगी आहे. राजासोबत घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताने अभिनव कोहली याच्याशी विवाह केला. रेयांश श्वेता-अभिनवचा मुलगा आहे. शिवाय पलकही श्वेताकडेच राहात आहे. ‘कसोटी जिंदगी की’ यामधून श्वेताला स्टारडम मिळाले. या मालिकेनंतर तिने ‘नागिन’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘परवरिश’ आणि ‘बलवीर’ आदी मालिकांमध्ये काम केले. दमदार भूमिकांमुळे अल्पावधीतच ती घराघरात पोहोचली. या व्यतिरिक्त श्वेता २०११ मध्ये सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोमध्ये सहभागी झाली होती. तिने या शोच्या किताबावर आपले नाव कोरले. Web Title: SEE PICS: Like the mother Shweta Tiwari, the girl takes care of her nine-month-old brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.