'Saraswati' fame will see Tikritcha Tawde in this series | 'सरस्वती' फेम तितिक्षा तावडे दिसणार 'ह्या' मालिकेत

'सरस्वती' फेम तितिक्षा तावडे दिसणार 'ह्या' मालिकेत

ठळक मुद्दे 'तू अशी जवळी रहा' मालिकेतील भूमिका खूप वेगळी - तितिक्षा तावडे 'तू अशी जवळी रहा' मालिकेत पाहायला मिळणार प्रेमकथा

'सरस्वती' मालिकेत दुहेरी भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री तितिक्षा तावडे लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती कोणत्या मालिकेत व कोणत्या भूमिकेत भेटीला येणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. ती झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी रहा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. 


'तू अशी जवळी रहा' या मालिकेच्या प्रोमोसोबत त्याच्या वेड्या प्रेमाला ती जिंकू शकेल का? असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे नक्कीच एक वेगळी प्रेमकथा यात पाहायला मिळणार आहे. ही मालिका १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तितिक्षासोबत अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थने अनन्या नाटकात अनन्याच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. त्याआधी नकुशी मालिकेत त्याने काम केले आहे. सिद्धार्थ व तितिक्षाने या मालिकेपूर्वी असे हे कन्यादान या मालिकेत एकत्र काम केलेले आहे. 


या मालिकेबाबत तितिक्षा म्हणाली की, 'माझ्या 'सरस्वती'च्या भूमिकेपेक्षा 'तू अशी जवळी रहा' या मालिकेतील माझी भूमिका खूप वेगळी आहे. सरस्वती ही गावातील मुलगी होती. मात्र आता नव्या मालिकेत करीत असलेली मुलगी ही शहरातील सुशिक्षित आहे आणि तिला स्वतःचे मत आहे. या मालिकेतून एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. अद्याप या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे मालिकेच्या कथेबद्दल आता काही सांगता येणार नाही.'
झी युवा वाहिनीवर तितिक्षाची बहिण खुशबू तावडे 'आम्ही दोघी' मालिकेत मीरा ही मुख्य भूमिका करत आहे. त्यामुळे या दोघी एकाच वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत. याबद्दल सांगताना तितिक्षा म्हणाली की, 'हा योगयोग आहे की आम्ही एकाच वाहिनीवरील मालिकेत काम करत आहोत. याव्यतिरिक्त माझ्या ताईचा नवरा संग्राम साळवी व माझी रुममेट गौरी नलावडे हे दोघे देखील या वाहिनीवरील सूर राहू दे या मालिकेत काम करत आहेत. त्यामुळे आम्ही चौघेही एका मागोमाग प्रसारीत होणाऱ्या मालिकेत दिसणार आहोत. आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.'


 

Web Title: 'Saraswati' fame will see Tikritcha Tawde in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.