Sara Khan looks out of Hospitality as an avatar, you will be very excited! | हॉस्पिटलमधून बाहेर येताच सारा खानचा दिसला हा अवतार,पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

हॉस्पिटलमधून बाहेर येताच सारा खानचा दिसला हा अवतार,पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

बॉलिवूड असो किंवा टीव्ही अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यावर रसिक अक्षरक्षा जीव ओवाळून टाकतात. सौंदर्यासह मादक अदांमुळे अभिनेत्रींनी रसिकांना वेड लावल्याची अनेक उदाहरणं आहेत. या यादीत आता आणखीन एका नावाची भर पडली आहे.छोट्या पडद्यावर 'सपना बाबुल का बिदाई' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अभिनेत्री सारा खान हिने सा-यांची मनं जिंकली होती. साराच्या अभिनयासह तिच्या अदाही रसिकांना भावल्या होत्या.आता एकदा सारा चर्चेत आली आहे.चर्चेला कारणीभूत ठरला आहे तिचा बिकनी अंदाजातला खास फोटो.'बिदाई' मालिकेतून प्रकाशझोतात आलेली सारा खानला आजही रसिक विसरलेले नाहीत. एरव्ही व्यावसायिक जीवनामुळे ती रसिकांचे लक्षवेधून घ्यायची मात्र आता ती वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते.एकेकाळी ऑनस्क्रीन मालिकेत संस्कारी बहू दिसणारी सारा रिअल लाइफमध्ये मात्र खूप बोल्ड आहे. रिल लाइफमध्ये ती जितकी साधी सरळ ऑनस्क्रीन दिसली त्याहूनही अधिक ती रिअल लाइफमध्ये हॉट आहे.

सोशल मीडियावर रोज तिचे वेगेवगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.ती नवा फोटो कधी टाकणार अशीही नेटक-यांना प्रतीक्षा असते एकंदरितच इतर अभिनेत्रींप्रमाणे साराही सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय ठरताना दिसते. 

सध्या सारा दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.यावेळी ती वेगवेगळ्या स्थळांना भेट देत तिथल्या गोष्टी कॅमे-यात कॅप्चर करते तर कधी बिचवर मस्त कुल अंदाजात फोटो काढताना दिसते.सवयीप्रमाणे साराने बिचवर क्लिक केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  या फोटोत ती गोल्डन कलरच्या बिकनीमध्ये पाहायला मिळत आहे.तिचे हे फोटो पाहताच नेटीझन्सनेही तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. 

विशेष म्हणजे तिच्या बर्थ डेच्या दिवशी तिला फुडपॉईजनिंग झाले होते त्यामुळे तिला काही दिवसांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.डिस्जार्ज मिळताच साराने पुन्हा तिचे व्हॅकेशनची मजा लुटण्यास सुरूवात केल्याचे पाहायला मिळाले आहे तर अनेक जण तिला आराम करण्याचा सल्लाही देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sara Khan looks out of Hospitality as an avatar, you will be very excited!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.