अधिक सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री नको त्या गोष्टी करताना दिसात. सुंदर दिसण्याच्या नादात अनेक अभिनेत्रींनी कधी ओठांची तर कधी नाकाची प्लास्टिक सर्जरी केल्याचे अनेक उदाहरणं आहेत. टीव्ही अभिनेत्री सारा खानने ओठांची सर्जरी केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे साराचा चेहरा आणखी खराब झाला. कधीकाळी तिच्या सौंदर्यावर फिदा होणार चाहते मात्र तिचे रुप पाहून आश्चर्यचकीत झाले. स्वतःचा सर्जरीनंतरचा फोटो तिने चाहत्यांसह शेअर केला होता. तिचा हा लूक चाहत्यांना अजिबात आवडला नव्हता.  

पूर्वी जसी होतीस तशीच सुंदर होतीस असे चाहते कमेंट्स देताना दिसले. सारा खानची  कॉस्मेटिक सर्जरी तिला चांगलीच महागात पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सारा चांगलीच ट्रोल झाली होती. या सर्व प्रकारामुळे साराला स्पष्टीकरण द्यावे लागले होते.  मी सर्जरी केली असून मला चांगले वाटत आहे. तसे मी आनंदी आहे.

माझी ओठांची सर्जरी चुकीची झाली आहे, असे म्हटले जात आहे. परंतु, ते चुकीचे आहे. मी लिप फिलर्सचा वापर केला आहे. ही लिप सर्जरी नाहीय. मी लीप सर्जरी केली असं जे लोक म्हणतात ते चुकीचे आहे, असं सारानं म्हटलं होते. 

मात्र दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयी वेगळेच मत मांडले होते. लिप फिलरनंतर मी अधिक आकर्षक दिसेल, असा माझा अंदाज होता. पण हे सगळे माझ्यावरच उलटले. सुंदर दिसण्याऐवजी त्याने माझा सुंदर चेहरा बिघडला. माझे ओठ मलाच आवडले नाहीत. मग ते इतरांना काय आवडणार. या

 

लिप फिलरनंतर वर्षभर मी अनेक अडचणींचा सामना केला. वर्षभर अगदी स्वत:ला आरशात बघण्याची हिंमतही होईना. कसेही करून फिलर कमी व्हावेत, यासाठी वाट पाहण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय राहिला नव्हता. सुदैवाने काळासोबत सगळे काही ठीक झाले आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.’

सारा खान ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं २००७ साली मिस भोपाळ हा किताब जिंकला होता. स्टार प्लसवरील 'सपना बाबूल का...'बिदाई' या मालिकेत तिनं साधनाची भूमिका साकारली असून ती लोकांच्या खूप पसंतीच पडली होती. 'बिदाई' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली साराला आजही साधना म्हणूनच चाहते ओळखतात. याच मालिकेने ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. याच मालिकेने तिला अमाप लोकप्रियता मिळाली होती.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sara Khan Looks Horrible After Plastic Surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.